मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dakshata Joil: अभिनेत्री दक्षता जोइल कडून जाणून घ्या हिवाळ्यातील हेअर आणि स्किन केअर टिप्स!

Dakshata Joil: अभिनेत्री दक्षता जोइल कडून जाणून घ्या हिवाळ्यातील हेअर आणि स्किन केअर टिप्स!

Jan 02, 2024 03:31 PM IST

Skin and Hair Care: छोट्या पद्यावरील प्रसिद्ध मालिका 'सारे काही तिच्यासाठी’मधील अभिनेत्री दक्षता जोइलने खास तिच्या चाहत्यांसाठी हिवाळ्यामध्ये त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी कशी काळजी घ्यायची याचे उपाय शेअर केले आहेत.

Learn Winter Hair and Skin Care Tips from Actress Dakshata Joil
Learn Winter Hair and Skin Care Tips from Actress Dakshata Joil (@dakshata_joil/ Instagram )

Actress Beauty Tips: संध्याकाळी ६:३० वाजता फक्त झी मराठी वाहिनी वर लागणारी सीरिअल 'सारं काही तिच्यासाठी' (Saara Kahi Tichyasathi) फारच प्रसिद्ध आहे. या मालिकेतील ' निशिगंधा खोत म्हणजेच दक्षता जोइल नेहमीच चर्चेत असते. तिचे निरोगी लांबलचक केस आणि स्वच्छ चमकदार त्वचेबद्दलही चर्चा होते. तिच्या या सुंदर स्किन आणि हेअर मागे काय रहस्य आहे हे आज तिने सगळ्यांसमोर उलघडल आहे. हिवाळ्यात तर आवर्जून त्वचा आणि केसांची काळजी घ्यावी लागते. यासाठी कितीही बाहेरचे प्रॉडक्टस वापरले गेले तरी घरगुती उपायांपेक्षा चांगले काही नाही. यासाठी तुमची लाडकी कलाकार दक्षता जोइल ती फॉलो करत असलेल्या काही टिप्स सांगत आहे. चला जाणून घेऊयात या टिप्स...

ट्रेंडिंग न्यूज

दक्षता सांगते की, “मी आठवड्याततुन एकदा रात्री पाण्याची वाफ घेते. रात्री ह्यासाठी कारण वाफ घेतली कि त्वचेची छिद्रे उघडतात आणि जर तुम्ही तसेच बाहेर गेलात तर त्या मध्ये धूळ जमा होईल आणि मग त्वचा खराब होयची सुरवात होते म्हणून मी रात्री वाफ घेते आणि त्या नंतर गुलाबपाणीने त्वचा साफ करते. जर तुमच्या चेहऱ्यावर पुटकूळी आली असेल तर फक्त त्याच्या भवती कापसा मध्ये गुलाबपाणी घेऊन फिरवायचे त्यांनी पुटकूळीची उष्णता ही कमी होण्यासाठी मदत होते . हे झाल्यावर मी घरात बनवलेला फेसपॅक लावते.त्या पॅक मध्ये संत्र्याच्या सालीची पावडर, चंदन पावडर, गावची अंबी हळद, मध, कच दूध आणि दुधाची मलाई असेल तर, गुलाब किंवा साधं पाणी ह्या सर्व साहित्यांची छान पेस्ट बनवून चेहऱ्याला लावते आणि ती थोडी सुकायला आली आहे असे दिसले कि पाणी लावून त्याला वरच्या दिशेनी मालिश करते, खालच्या दिशेनी जर मालिश केली तर कातडी लूज पडते म्हणून नेहमी मालिश वरच्या दिशेनेच केली पाहिजे. मालिश करून झाले कि फेसपॅक पाण्यानी धुते. हिवाळ्या मध्ये जास्त वेळ जर चेहऱ्यावर फेसपॅक ठेवला आणि तो एक्दम सुकून दिला तर त्वचा कोरडी पडते. फेसपॅक धुवून झाल्यावर मी गुलाबपाणी लावते काही जण तूप ही लावतात. जर ह्या क्रिया नंतर मला अचानक बाहेर पडायचं असेल किंवा आऊटडोर शूटिंग असेल तर मी वॉटरबॅसेड सनस्क्रीन लावते जर वॉटरबॅसेड सनस्क्रीन नसेल तर चेहरा सफेद पडतो."

पुढे यातच ती ऍड करते की, " मला घरगुती गोष्टी जास्त आवडतात माझ्या त्वचा आणि केसांच्या छान तब्बेतीसाठी. केसांसाठी मी एक तेल घरी बनवते. मी कोकणातली आहे तर तिथून शुद्ध घाणेवरच नारळाचं तेल आम्ही आणतो, त्या तेलात जास्वंदीची फुलं, मेथी दाणे , कांदा असेल तर उत्तम किंवा कडीपत्ता हे सगळं त्या तेलात टाकून त्याला उकाळ देते. कडीपत्त्याची पाने थोडी काळपट अशी झाली कि कळून येत आणि गॅस बंद करून, आणि थंड झाल्यावर त्याला मी एका बाटलीत ठेवते. माझे हिवाळ्यात पहिले खूप केस गळायचे पण जेव्हा पासून हे तेल वापरतेय मला फरक कळून यायला लागला. तेल लावताना टाळू वर बोटानी हलक्यानी मालिश करते आणि मग मोट्या दातांच्या फणीने केस विंचरून त्याची वेणी घालून ठेवते म्हणजे धुताना जटा होत नाही. मी ह्या सर्व गोष्टी करते स्वतःच्या त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी. तुम्ही जर ह्या गोष्टींचा वापर करणार असाल तर आधी एका छोट्या भागावर चाचणी करून घ्या स्वतःच्या त्वचे वर कारण सर्वांची त्वचा वेगळी असते जर तुम्हाला कश्याची ऍलर्जी असेल तर तुम्हाला कळेल आणि तसा तुम्ही ह्या घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.”

 

WhatsApp channel