Winter Food: हिवाळ्यात अनेक पदार्थ बनवून खाल्ले जातात. हे पदार्थ पचतातही अणि शरीराला फायदाही देतात. अनेक हेल्दी पदार्थ हिवाळ्यात शरीराला उबदार थेवयाला मदत करतात. थंडीत बाजरी, ज्वारी आणि मक्यापासून बनवलेली भाकरी अनेक घरात बनवली जाते. पण या भकरीचे पीठ मळताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पीठ नीट मळले गेले नाही तर भाकरी खूप घट्ट आणि कडक होते. अशी भाकरी खावीशी वाटत नाही. तुम्हालाही पीठ मळताना अडचण येत असेल तर, शेफ पंकज भदौरिया यांच्याकडून टिप्स जाणून घ्या. ज्याच्या मदतीने भाकरी पातळ आणि मऊ होतील.
बाजरीचे पीठ मळण्यासाठी आधी पाणी गरम करा. नंतर त्यात चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेल घाला. नंतर त्यात बाजरीचे पीठ घालून झाकून ठेवा. दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून बाजरीचे पीठ पाण्यात चांगले मिसळून प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर हाताने नेहमीप्रमाणे चांगले मळून घ्या. पीठ मऊ मळून घ्या.
मक्याच्या पिठाची भाकरी जास्त केली जात नाही. पीठ मळून घेण्यासाठी शेफ पंकज भदौरिया सांगतात की मक्याचे पीठ मळून घेण्यासाठी एकावेळी पीठाचे एक किंवा दोन गोळे मळून घ्या. हे पीठ जास्त वेळ विश्रांतीसाठी ठेवू नये. गरम पाणी घालून पटकन मळून घ्या आणि लगेच भाकरी तयार करा.
ज्वारीचे पीठ मळण्यासाठीही पाणी गरम करून घ्या. नंतर पिठात मीठ आणि थोडे तेल घालून पीठ मळून घ्या. हे पीठ ठेवण्याऐवजी आपण लगेचच भाकऱ्या बनवायला सुरुवात करा. भाकरी हातानेच बनवा यामुळे भाकरी तुटण्याची भीती कमी होईल आणि भाकरी सहज तयार होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)