Leap Year 2024: दर चार वर्षांनी का साजरे केले जाते लीप इयर, जाणून घ्या या दिवसाशी संबंधित रंजक गोष्टी-leap year 2024 why leap year is celebrated every four year know the history and interesting facts ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Leap Year 2024: दर चार वर्षांनी का साजरे केले जाते लीप इयर, जाणून घ्या या दिवसाशी संबंधित रंजक गोष्टी

Leap Year 2024: दर चार वर्षांनी का साजरे केले जाते लीप इयर, जाणून घ्या या दिवसाशी संबंधित रंजक गोष्टी

Feb 29, 2024 08:44 AM IST

Leap Year History: २९ फेब्रुवारी म्हणजेच लीप डे दर चार वर्षांनी एकदाच का येतो? जाणून घेऊया लीप इयर चार वर्षांनी एकदा का साजरे केले जाते आणि लीप इयरशी संबंधिक काही रंजक गोष्टी.

लीप इयरचा इतिहास आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्स
लीप इयरचा इतिहास आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्स (Freepik)

Leap Year Interesting Facts: चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात लीप डे साजरा केला जाते. लीप इयरमध्ये फेब्रुवारी महिन्यात एक अतिरिक्त दिवस जोडला जातो. त्यामुळे लीप इयरमध्ये फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस असतात. पण तुम्हाला माहीत आहे का २९ फेब्रुवारी म्हणजेच लीप डे दर चार वर्षांनी एकदाच का येतो? चला जाणून घेऊया लीप इयर दर चार वर्षांनी एकदा का साजरे केले जाते, लीप इयरचा इतिहास काय आहे आणि लीपशी संबंधित इंटरेस्टिंग फॅक्ट्स

लीप इयरचा इतिहास

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार (gregorian calender) दर ४ वर्षांनी १ अतिरिक्त दिवस जोडला जातो. फेब्रुवारी महिन्यात हा दिवस जोडल्यास हा महिना २८ दिवसांऐवजी २९ दिवसांचा होतो. या अतिरिक्त दिवसाला लीप डे (Leap Day) म्हणतात आणि या वर्षाला लीप इयर (Leap Year) म्हणतात.

रोमन साम्राज्य सुमारे ३०००.४५ ईसपूर्व झाले. त्याचा शासक ज्युलियस सीझरला वाटले की हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे तीन वेगवेगळे ऋतू आहेत हे ओळखण्याची वेळ आली आहे. त्यावर आधारित महिने असावेत. त्यांनी १२ महिने आणि ३६५ दिवसांचे कॅलेंडर तयार केले. काही दिवस सर्व चांगले गेले. परंतु नंतर त्यांना समजले की पृथ्वीवर ३६५ ऐवजी ३६५.२४ दिवस आहेत. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला अंदाजे ३६५.२५ दिवस लागतात. त्यानंतर पुन्हा एकदा कॅलेंडरमध्ये आवश्यक बदल करण्यात आले. यावेळी सीझरने मानवनिर्मित आणि सौर कॅलेंडर फॉलो करणारे एक कॅलेंडर तयार केले, ज्यामध्ये दर चार वर्षांनी लीप वर्ष होते. यासह ज्युलियस सीझरला आधुनिक लीप वर्षाचे जनक घोषित करण्यात आले.

लीप इयरशी संबंधित रंजक गोष्टी

- ग्रीसमध्ये लीप वर्षात लग्न करणे अशुभ मानले जाते.

- प्रभु येशूच्या जन्माच्या चार वर्षांनी पहिले लीप वर्ष आले. तेव्हापासून दर चार वर्षांनी एक लीप वर्ष येते.

- गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका कुटुंबाचे नाव आहे ज्यामध्ये २९ फेब्रुवारी रोजी सलग तीन पिढ्यांचा जन्म झाला. पीटर अँथनी यांचा जन्म १९४० मध्ये आयर्लंडमध्ये झाला. त्यांचा मुलगा, पीटर एरिक, १९६४ मध्ये लीप डे रोजी जन्मला आणि त्यांची नात, बेथनी वेल्थी, २९ फेब्रुवारी १९९६ रोजी जन्मली.

- जर आपण लीप वर्ष साजरे केले नाही तर आपण सौर मंडळाच्या कालचक्राच्या ६ तासांनी दरवर्षी पुढे जाऊ.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग