Flower Rangoli Designs: लक्ष्मी पूजनला काढा फुलांची रांगोळी, वाढेल घराचे सौंदर्य
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Flower Rangoli Designs: लक्ष्मी पूजनला काढा फुलांची रांगोळी, वाढेल घराचे सौंदर्य

Flower Rangoli Designs: लक्ष्मी पूजनला काढा फुलांची रांगोळी, वाढेल घराचे सौंदर्य

Updated Nov 11, 2023 10:28 PM IST

Diwali Flower Rangoli: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अंगणात आणि घरात सजावट करण्यासाठी तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता. ही कमी वेळेत तयार होते आणि शिवाय याने घराचे सौंदर्य सुद्धा वाढते. दिवाळीला काढता येतील अशा सोप्या व सुंदर फुलांच्या रांगोळीच्या डिझाईन येथे पाहा.

दिवाळीसाठी फुलांची रांगोळी
दिवाळीसाठी फुलांची रांगोळी

Flower Rangoli Design for Laxmi Pujan: दिवाळीला प्रत्येकाच्या दारात रांगोळी काढली जाते. त्याचे वेगळे महत्त्व आहे. खरं तर हिंदू धर्मात रांगोळी खूप शुभ मानली जाते. हे प्रत्येक पूजेमध्ये काढले जाते. कारण ते देवांना प्रसन्न करते असे मानले जाते. अशा परिस्थितीत हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण दिवाळी उद्या म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या प्रसंगी तुम्ही लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तुमचे घर सजवण्यासाठी फुलांच्या रांगोळीची डिझाईन करू शकता. येथे फुलांच्या रांगोळीचे डिझाईन पहा.

फुलांची रांगोळी
फुलांची रांगोळी
दिवाळीसाठी फुलांची रांगोळी
दिवाळीसाठी फुलांची रांगोळी

अशा प्रकारची रांगोळी तुम्ही फुलांनी बनवू शकता. हे दिसायला अवघड आहे पण बनवायला अगदी सोपे आहे. हे बनवण्यासाठी सेंटरपासून सुरुवात करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रथम पेन्सिल किंवा खडूने डिझाइन काढू शकता आणि नंतर फुलांनी भरू शकता.

दिवाळीसाठी फुलांची रांगोळी डिझाईन
दिवाळीसाठी फुलांची रांगोळी डिझाईन
फुलांची सोपी रांगोळी
फुलांची सोपी रांगोळी

दिवाळीचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा असतो. या दिवशी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावले जातात. तसेच तुम्ही झेंडूच्या फुलांनी प्रवेशद्वार सजवू शकता. जेणेकरुन देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी घरावर राहील. हे एक अतिशय आकर्षक डिझाइन आहे, जे तुम्ही सहज बनवू शकता. ही रांगोळी तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी आणि पानांनी बनवू शकता. अशा प्रकारची रांगोळी तुम्ही दिव्यांनी सजवू शकता. कमी वेळेत सुंदर रांगोळी काढण्यासाठी तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता.

 

लक्ष्मी पूजनासाठी फुलांची रांगोळी
लक्ष्मी पूजनासाठी फुलांची रांगोळी
फुलांची रांगोळी
फुलांची रांगोळी

सर्कल रांगोळी डिझाइन करायची असेल तर अशा प्रकारची डिझाईन करता येते. या प्रकारच्या डिझाइनमध्ये मध्यभागी एक मोठा दिवा ठेवता येतो

फुलांच्या रांगोळीची सोपी डिझाईन
फुलांच्या रांगोळीची सोपी डिझाईन
दिवाळीसाठी सोपी फुलांची रांगोळी
दिवाळीसाठी सोपी फुलांची रांगोळी

दिवाळीसाठी पटकन तयार करता येईल असे डिझाइन तुम्ही शोधत असाल तर या डिझाईन्स तुमच्यासाठी आहेत. ही एक अतिशय सोपी डिझाईन आहे, ज्यामध्ये तुम्ही मध्यभागी असलेले फूल काढून देवीचे पावलं किंवा दिवा ठेवू शकता.

दिवाळीला घरात सजावट करण्यासाठी फुलांची रांगोळी
दिवाळीला घरात सजावट करण्यासाठी फुलांची रांगोळी

या दिवाळीत फक्त दारातच नाही तर तुम्ही घरातही अशा प्रकारे फुलांच्या रांगोळीने सजावट करु शकता. यात तुम्ही दिवे, समई लावून सजावट करु शकता. तसेच पाण्यात फ्लोटिंग मेणबत्त्या सुद्धा लावू शकता.

दिवाळीसाठी आकर्षक फुलांची रांगोळी
दिवाळीसाठी आकर्षक फुलांची रांगोळी

तुमच्याकडे रांगोळी काढण्यासाठी जास्त वेळ नसेल तर फुलांनी बनवलेल्या या रांगोळीच्या डिझाईन्स अतिशय सुंदर तर दिसतातच पण बनवायलाही खूप सोप्या असतात.

Whats_app_banner