Lal bahadur shastri quotes: २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ही जयंती साजरी केली जाते. साधेपणा, शालीनता, शिस्त, कर्तव्यनिष्ठता, प्रामाणिकपणा, दृढ निश्चयी व्यक्तिमत्त्व आणि अद्भुत कार्यक्षमता यासाठी शास्त्री ओळखले जातात. लहान उंचीचे प्रचंड मोठे मन असलेले शास्त्री आंतरिक शक्तीने संपन्न होते. १९६५ च्या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभूत केले तेव्हा ते देशाचे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी ''जय जवान, जय किसान'' चा नारा दिला होता. सैनिक आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणे हा त्यामागचा उद्देश होता. या घोषणेने भारत आणि शेतीच्या सुरक्षेला नवी दिशा दिली आणि देशवासियांना स्वावलंबी होण्याची प्रेरणा दिली. हा नारा आजही देशातील सैनिक आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करतो.
देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात आणि हरितक्रांती घडवून आणण्यात शास्त्री यांचेही खूप महत्त्वाचे योगदान आहे. १९६० च्या दशकात जेव्हा भारत अन्नसंकटाचा सामना करत होता, तेव्हा लालबहादूर शास्त्री यांनी हरितक्रांतीचा पाया रचताना कृषी सुधारणांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली. भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी श्वेतक्रांतीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा प्रकारे ते श्वेतक्रांती आणि हरितक्रांतीचे प्रणेते बनले.
भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे विचार आपले जीवन बदलू शकतात. आज त्यांच्या जयंतीनिमित्त पाहा त्यांचे काही प्रेरणादायी विचार -
- युद्धात आपण जितके धैर्याने लढतो तितक्याच धैर्याने शांततेसाठी लढले पाहिजे.
- स्वातंत्र्याचे रक्षण हे केवळ आपल्या सैनिकांचे काम नाही. त्याचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण देश मजबूत असणे गरजेचे आहे. हे संपूर्ण देशाचे कर्तव्य आहे.
-खोटेपणा आणि हिंसेच्या जोरावर खरे स्वराज्य किंवा लोकशाही कधीच प्राप्त होऊ शकत नाही, हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे.
- एखाद्या प्रकारे अस्पृश्य म्हणवणारी एकही व्यक्ती असेल तर भारताला शरमेने डोके टेकवावे लागेल.
-प्रत्येक कामाची स्वतःची प्रतिष्ठा असते आणि प्रत्येक कार्य पूर्ण क्षमतेने करण्यातच समाधान मिळते.
-आपापसात लढण्यापेक्षा देशाच्या प्रगतीसाठी गरिबी, रोगराई आणि अज्ञानाशी लढावे लागेल.
- देशाच्या सामर्थ्यासाठी आणि कर्तुत्वासाठी सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे लोकांमध्ये एकता प्रस्थापित करणे.
-आमचा शांतता, विकास आणि कल्याणावर विश्वास आहे, केवळ स्वत:साठीच नाही तर संपूर्ण जगासाठी.
-जेव्हा स्वातंत्र्य आणि अखंडता धोक्यात येते, तेव्हा त्या आव्हानाला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाणे हे कर्तव्य च कर्तव्य आहे.
-आमचा मार्ग सरळ आणि स्पष्ट आहे. आपल्या देशात सर्वांना स्वातंत्र्य आणि समृद्धी असलेली समाजवादी लोकशाही प्रस्थापित करणे आणि इतर सर्व देशांशी जागतिक शांतता आणि मैत्री राखणे.