मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: या तीन ठिकाणी लक्ष्मी करते वास, जाणून घ्या चाणक्य नीती!

Chanakya Niti: या तीन ठिकाणी लक्ष्मी करते वास, जाणून घ्या चाणक्य नीती!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 18, 2023 08:42 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

चाणक्य नीती
चाणक्य नीती

Chanakya Niti: लोक संपत्ती आणि समृद्धीसाठी विविध उपाय करतात. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा असं सगळ्यांचं वाटतं. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्याला आजही उपयोग होतो. त्यात असे सांगितले जाते की जिथे मुर्खांचा आदर केला जातो तिथे लक्ष्मी क्षणभरही राहत नाही. याशिवाय ज्या घरात पती-पत्नीमध्ये मतभेद असतात, त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. जर तुम्ही महान अर्थशास्त्रज्ञ चाणक्य यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिले तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल. पैशाची कमतरता भासणार नाही. चला जाणून घेऊया देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी चाणक्य नीति काय सांगते ते...

ट्रेंडिंग न्यूज

आचार्य चाणक्य म्हणतात की जिथे मुर्खांचा आदर केला जात नाही, धान्य भरपूर असते आणि पती-पत्नीमध्ये मतभेद नसतात, तिथे लक्ष्मी स्वतः येते. या ठिकाणी नेहमी सुख आणि संपत्ती असते.

मूर्खाः यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसंचितम्।

दाम्पत्योः कलहो नास्ति तत्र श्री स्वयमागता॥

जिथे मुर्खांचा आदर केला जातो

चाणक्य नीती दर्पणमध्ये म्हटले आहे की जिथे मूर्खांचा आदर केला जातो तिथे लक्ष्मी क्षणभरही राहत नाही. जो मूर्ख माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो त्याचे नेहमीच नुकसान होते. त्यामुळे लक्ष्मी देवीला प्रसन्न करायचे असेल तर मूर्ख आणि खुशामत करणाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मूर्ख आणि खुशामत करणारे दोघेही चांगला सल्ला देत नाहीत.

पती-पत्नीमध्ये भांडण

आचार्य चाणक्य सांगतात की, ज्या घरात पती-पत्नीमध्ये नेहमी कलह असतो त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचे असेल तर घरात शांततेचे वातावरण ठेवा. पती-पत्नीच नव्हे तर कोणाशीही भांडू नका. लक्ष्मीची कृपा सदैव राहील.

जिथे अन्नाचा साठा भरतो

आचार्य चाणक्य यांच्या म्हणीचा अर्थ असा आहे की, जो खूप कष्ट करून अन्नाचा साठा करतो त्याच्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे माणसाने कठोर परिश्रम केले पाहिजेत. अशा घरात लक्ष्मी स्वतः येईल.

WhatsApp channel