Lakshmi pujan 2024: देवी लक्ष्मीला पसंत आहे 'हा' नैवैद्य, जाणून घ्या लिस्ट आणि रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lakshmi pujan 2024: देवी लक्ष्मीला पसंत आहे 'हा' नैवैद्य, जाणून घ्या लिस्ट आणि रेसिपी

Lakshmi pujan 2024: देवी लक्ष्मीला पसंत आहे 'हा' नैवैद्य, जाणून घ्या लिस्ट आणि रेसिपी

Published Oct 30, 2024 11:39 AM IST

Diwali Lakshmi Pujan Naivedya: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष नैवेद्य केला जातो. आज आपण देवी लक्ष्मीच्या काही आवडत्या नैवेद्याची यादी आणि त्यांच्या रेसिपी जाणून घेणार आहोत.

Lakshmi Pujan 2024
Lakshmi Pujan 2024

Lakshmi Pujan 2024: दिवाळी हा सण विशेषत: लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी साजरा केला जातो. या दिवशी भक्त आपले घर स्वच्छ करतात, दिवे लावतात आणि देवी लक्ष्मीचे स्वागत करतात. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष नैवेद्य केला जातो. आज आपण देवी लक्ष्मीच्या काही आवडत्या नैवेद्याची यादी आणि त्यांच्या रेसिपी जाणून घेणार आहोत.

दुधापासून बनवलेल्या पांढऱ्या शुभ्र मिठाई-

साहित्य-

दूध- १ लिटर

लिंबाचा रस: २ चमचे

साखर: १०० ग्रॅम

तूप : २ चमचे

पिस्ता: सजवण्यासाठी

 

रेसिपी-

-सर्वप्रथम एका कढईमध्ये दूध घेऊन तो उकळून घ्या. आता उकळताना त्यात लिंबाचा रस घालून दुधाचे पनीर करून घ्या.

-फाटलेले दूध गाळून घ्या आणि पाणी बाजूला काढा. उरलेले पनीर चांगले पिळून घ्या.

-आता एका कढईत तूप गरम करून त्यात पनीर केलेले दूध घाला. नंतर त्यात साखर घालून मिक्स करा.

-हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा. शेवटी तूप लावलेल्या एका प्लेटमध्ये ठेवून रोल करा.

-थंड झाल्यावर त्याला पिस्त्याने सजवा आणि देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करा.

बताशे-

साहित्य-

साखर- २ कप

पाणी- १ कप

नारळ- १ कप (किसलेले)

पिस्ता आणि बदाम: ५० ग्रॅम (चिरलेला)

वेलचीपूड- २ चमचे

 

बताशे रेसिपी-

-सर्वप्रथम एका कढईत पाणी आणि साखर घालून पाक बनवा.

-पाक चांगले तयार झाल्यावर त्यात किसलेले खोबरे, पिस्ता, बदाम आणि वेलचीपूड घाला.

-हे साहित्य नीट मिक्स करून गॅस बंद करा.

-आता मिश्रण एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये ठेवा आणि ते रोल करा. थंड झाल्यावर त्याला गोलाआकार आकारात कापून घ्या.

-अशाप्रकारे देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून बताशा अर्पण करा.

 

साहित्य-

माखना: २०० ग्रॅम

दूध: १ लिटर

साखर: १०० ग्रॅम

तूप : २ चमचे

सुका मेवा (बदाम, काजू, मनुका): ५० ग्रॅम

वेलचीपूड

रेसिपी-

-सर्व प्रथम, मखना मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे त्यांचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

-आता कढईत तूप गरम करून त्यात भाजलेला मखना घाला. थोडा वेळ तळून घ्या.

-नंतर त्यात दूध घालून उकळा. दुधाला उकळी आली की त्यात साखर आणि वेलची पावडर घाला.

- मंद आचेवर खीर घट्ट होईपर्यंत शिजू द्या. शेवटी ड्राय फ्रुट्स घालून मिक्स करा.

- देवी लक्ष्मीला गरम मखना खीर अर्पण करा.

 

हा नैवेद्य अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. ही मिठाई केवळ रुचकर नसून त्यांना खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण या नैवेद्यांसह देवी लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा आपल्या समृद्धीचे आणि आनंदाचे दरवाजे उघडतात. या दिवाळीत, आपल्या घरी हे विशेष भोग तयार करून देवी लक्ष्मीचे स्वागत करा आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा.

Whats_app_banner