मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kullu Dussehra 2022: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ७ दिवस साजरा होतो विजयादशमीचा उत्सव!

Kullu Dussehra 2022: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ७ दिवस साजरा होतो विजयादशमीचा उत्सव!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 05, 2022 01:14 PM IST

सात दिवस चालणारा कल्लूचा दसरा हिमाचलच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचे प्रतीक आहे. चला जाणून घेऊया कुल्लूमधील दसऱ्याच्या सेलिब्रेशनबद्दलच्या खास गोष्टी.

विजयादशमीचा सण
विजयादशमीचा सण (HT Files)

आज देशभरात विजयादशमीचा सण साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कुलू येथे विजयादशमी उत्सव साजरा करणार आहेत. कुल्लूचा दसरा जगभरात प्रसिद्ध आहे. कुल्लूमध्ये दसऱ्याचा सण अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. देशभर रावण दहन करून हा सण साजरा केला जातो, तेव्हा कुल्लूमध्ये दसरा सुरू होतो. आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवसापासून सुरू झालेला हा सण पुढील सात दिवस साजरा केला जातो. ज्यात ना रावणाचा पुतळा जाळला जातो ना त्याच्या कथा सांगितल्या जातात. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कुल्लू येथील दसऱ्याच्या सणाविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत.

१. कुल्लूचा दसरा साजरा करण्याचा इतिहास खूप जुना आहे. १६६२ मध्ये पहिल्यांदा धलपूर मैदानावर दसरा साजरा करण्यात आला होता, तेव्हाच देवाच्या परंपरेतून हा उत्सव सुरू झाला होता.

२. संपूर्ण जग दसरा साजरा करत असताना हिमाचलमधील कुल्लू येथेही हा अनोखा दसरा सुरू होतो. येथे दसऱ्याचा सण ७ दिवस चालतो. या निमित्ताने सुमारे १००० देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि त्यात सहभागी होतात, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे.

३. असं म्हणतात की हिमाचलच्या जवळपास प्रत्येक गावात एक वेगळी देवता असते. लोकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. दसऱ्याच्या वेळी सजवलेल्या पालखीवर बसून शंभरहून अधिक देवतांचा समावेश होतो.

४. हिमाचल प्रदेशची संस्कृती, परंपरा, चालीरीती आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून कुल्लूचा दसरा खूप महत्त्वाचा मानला जातो. भगवान रामाच्या रथयात्रेने येथे दसऱ्याची सुरुवात होते. या दरम्यान सर्व स्थानिक देवता ढोल-ताशांच्या तालावर देवांना भेटायला येतात.

५. आम्ही तुम्हाला सांगतो की कुल्लूमध्ये दसरा उत्सवाच्या पहिल्या दिवशी, दसऱ्याची देवी आणि मनालीची हिडिंबा कुल्लूमध्ये येतात. या दरम्यान राजघराण्यातील सर्व सदस्य देवी-देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात.

(या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या