Valentine Day Outfit: व्हॅलेंटाईन इव्हनिंगसाठी परफेक्ट आहे क्रिती सेननचा हा आउटफिट, पाहा याची किंमत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Valentine Day Outfit: व्हॅलेंटाईन इव्हनिंगसाठी परफेक्ट आहे क्रिती सेननचा हा आउटफिट, पाहा याची किंमत

Valentine Day Outfit: व्हॅलेंटाईन इव्हनिंगसाठी परफेक्ट आहे क्रिती सेननचा हा आउटफिट, पाहा याची किंमत

Feb 06, 2024 10:10 PM IST

Valentine's Day Fashion Tips: क्रिती सेननने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लाल ड्रेस घातलेले फोटो शेअर केले आहेत. हा ड्रेस व्हॅलेंटाईन डेसाठी परफेक्ट आहे. जाणून घ्या ड्रेसची किंमत

व्हॅलेंटाईन डेसाठी क्रिती सेननचा रेड ड्रेस
व्हॅलेंटाईन डेसाठी क्रिती सेननचा रेड ड्रेस

Kriti Sanon in Red Dress: फेब्रुवारी महिना सुरू होताच व्हॅलेंटाईन डेसाठी काही खास प्लॅनिंग सुरु होते. व्हॅलेंटाईन डेला कपल्स डेटवर जातात. जर तुम्ही या खास दिवसासाठी तुमचा खास लुक प्लॅन करत असाल तर तुम्ही क्रिती सेननचा रेड आउटफिट लूक ट्राय करू शकता. तिचा हा आउटफिट व्हॅलेंटाइन डेसाठी एकदम परफेक्ट आहे. मात्र, या ड्रेसची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. येथे जाणून घ्या अभिनेत्रीचा लुक कसा आहे आणि या ड्रेसची किंमत.

कसा आहे आउटफिट?

क्रितीचा आउटफिट खूपच सुंदर आहे. या ड्रेसवर लाल चेक असलेली प्रिंट आहे. ड्रेसमध्ये कॉलर नेकलाइन, फुल स्लीव्हज, फ्रंट बटण क्लोजर, कंबरेला बेल्ट, बटन कफ आहेत.

 

क्रिती सेनन रेड ड्रेस
क्रिती सेनन रेड ड्रेस

ॲक्सेसरीज आणि हेअरस्टाइल आहे खास

क्रितीने आपल्या लूकला शायनिंग काळे शूज, सोन्याचे स्टड इअररिंग्स, स्टॅक्ड स्टेटमेंट रिंग आणि स्लीक ब्लॅक हँडबॅग आणि काळा सनग्लासेससह पूर्ण केले आहे. लूक सुंदर बनवण्यासाठी तिने न्यूड आयशॅडो, मस्करा आयलॅशेस, विंग्ड आयलायनर, डार्क आयब्रो आणि हायलाइटरसोबतच न्यूड लिपस्टिकच्या शेडने आपला लूक पूर्ण केला. तिने सिंपल बनमध्ये तिची हेअर स्टाइल केली आहे.

 

व्हॅलेंटाईन डेसाठी क्रिती सेननचा आउटफिट
व्हॅलेंटाईन डेसाठी क्रिती सेननचा आउटफिट

काय आहे ड्रेसची किंमत?

जर तुम्हाला क्रितीचा लूक आवडला असेल आणि तिच्यासारखा आउटफिट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर याची किंमत ऐकून थक्क व्हाल. क्रितीने हा ड्रेस लक्झरी फॅशन ब्रँड बर्बेरीच्या कलेक्शनमधून निवडला आहे. या ड्रेसची किंमत ९५,५८९ रुपये आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner