Janmashtami Recipe: जन्माष्टमीला बनवा कृष्णाचा आवडता नैवेद्य दहीकाला, फारच सोपी आहे रेसिपी-krishna janmashtami 2024 make special dahikala for naivedya to krishna ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Janmashtami Recipe: जन्माष्टमीला बनवा कृष्णाचा आवडता नैवेद्य दहीकाला, फारच सोपी आहे रेसिपी

Janmashtami Recipe: जन्माष्टमीला बनवा कृष्णाचा आवडता नैवेद्य दहीकाला, फारच सोपी आहे रेसिपी

Aug 25, 2024 09:40 AM IST

Janmashtami 2024 Naivedya Recipe: भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलेल्या नैवेद्यांपैकी एक नाव म्हणजे दहीकाला होय.

कृष्णाला नैवेद्यासाठी स्पेशल दहीकाला रेसिपी
कृष्णाला नैवेद्यासाठी स्पेशल दहीकाला रेसिपी

Krishna Janmashtami Special Dahikala: यावर्षी कृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. अशा वेळी कान्हाचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक पदार्थ प्रसादात अर्पण करतात. भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलेल्या नैवेद्यांपैकी एक नाव म्हणजे दहीकाला होय. दहीकाला हा श्रीकृष्णाला आवडणारा एक चवदार पदार्थ आहे. जो कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने नक्कीच बनवला जातो. 

दहीकाला हे भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील साधेपणा आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. दहीकाला हा श्रीकृष्णाच्या शुभप्रसंगी तयार होणाऱ्या विशेष भोगांपैकी एक आहे. दहीकाला हा ताज्या भाज्या आणि मसाल्यांपासून बनवलेला एक चवदार पदार्थ आहे. या कृष्ण जन्माष्टमीला तुम्हीसुद्धा स्वतःच्या हाताने दहीकाला बनवून श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. या चविष्ट अशा दहीकाल्याची रेसिपी फारच सोपी आहे.

दहीकाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

- १ कप पोहे

- १/२ कप ताजे दही

-१/४ कप किसलेले खोबरे

-१ बारीक चिरलेली छोटी काकडी

-१ बारीक चिरलेली छोटी हिरवी मिरची

-२ चमचे भाजलेले शेंगदाणे

-१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

- १ टीस्पून जिरे

- १ टीस्पून मोहरी

- १/२ टीस्पून साखर

- चवीनुसार मीठ

- १ टेबलस्पून तूप

- कढीपत्ता

- सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे

दहीकाला बनवण्यासाठी आधी पोहे तयार करा. यासाठी जाड पोहे वाहत्या पाण्याखाली चाळणीत धुवून सर्व पाणी काढून टाका. व बाजूला पाणी नितळण्यासाठी ठेवावे. आता एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये भिजवलेले पोहे, दही, किसलेले खोबरे, चिरलेली काकडी, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. आता एका छोट्या कढईत तूप गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाका आणि काही सेकंद तडतडू द्या. आता ही फोडणी पोह्यांच्या मिश्रणात घाला, चवीनुसार साखर आणि मीठ घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा. आता तुमचा नैवेद्याचा दहीकाला बनून तयार आहे.