Korean Beauty Tips: तुम्हालाही हवाय कोरियनसारखा चमकदार चेहरा? रुपयाही खर्च न करता करा हे घरगुती उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Korean Beauty Tips: तुम्हालाही हवाय कोरियनसारखा चमकदार चेहरा? रुपयाही खर्च न करता करा हे घरगुती उपाय

Korean Beauty Tips: तुम्हालाही हवाय कोरियनसारखा चमकदार चेहरा? रुपयाही खर्च न करता करा हे घरगुती उपाय

Published Jul 31, 2024 10:59 AM IST

Korean Beauty Tips In Marathi: कोरियन लोकांच्या काचेसारख्या चमकणाऱ्या, डागविरहित आणि नितळ त्वचेची सर्वांनाच भुरळ पडत आहे. कोरियन लोकांची त्वचा अतिशय निरोगी समजली जाते.

तुम्हालाही हवाय कोरियनसारखा चमकदार चेहरा
तुम्हालाही हवाय कोरियनसारखा चमकदार चेहरा

Korean Beauty Tips Marathi: जगभरात सध्या कोरियन ड्रामा धुमाकूळ घालत आहेत. भारतामध्येसुद्धा कोरियन सीरिजना लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. शिवाय आणखी एक गोष्ट लोकांना आकर्षित करत आहे. ती गोष्ट म्हणजे कोरियन ब्युटी होय. कोरियन लोकांच्या काचेसारख्या चमकणाऱ्या, डागविरहित आणि नितळ त्वचेची सर्वांनाच भुरळ पडत आहे. कोरियन लोकांची त्वचा अतिशय निरोगी समजली जाते. असे म्हटले जाते की कोरियन मुली नैसर्गिक गोष्टींनी त्यांच्या त्वचेची काळजी घेणे पसंत करतात. इतकेच नव्हे तर ते आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये अशा अनेक गोष्टी वापरतात ज्यामुळे त्वचा सहज स्वच्छ, टोन आणि मॉइश्चरायझ होऊ शकते.

हे सत्य आहे की, कोरियन लोकांच्या त्वचेची पोत तेथील वातावरण, नैसर्गिक घटक आणि खाणपानावर अवलंबून आहे. मात्र काही प्रमाणात त्यांच्या स्किन केअर रुटीनचासुद्धा फायदा त्यांच्या स्किनला मिळत असतो. त्यामुळेसुद्धा त्यांची स्किन नेहमीच चमकदार दिसते. कोरियन स्किन केअर रुटीनमध्ये अशा अनेक घरगुती वस्तूंचा समावेश होतो, ज्या त्वचेसाठी फायदेशीर मानल्या जातात. इतकंच नाही तर त्वचेच्या अनेक समस्या यामध्ये असलेल्या गुणधर्मांद्वारे दूर केल्या जाऊ शकतात. जर तुम्हीही कोरियन सौंदर्याने प्रभावित असाल आणि त्यांच्यासारखी त्वचा हवी असेल तर तुम्हीही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.

उकळलेल्या तांदळाचे पाणी

कोरियामध्ये, भिजवलेला तांदूळ त्वचेची काळजी घेण्याच्या गोष्टींमधील एक प्रमुख घटक मानला जातो. हे भिजवलेले तांदूळ खराब झालेली त्वचा बरी करते आणि त्वचेमधील कोलेजनच्या उत्पादनासदेखील प्रोत्साहन देते. शिवाय त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून आपला बचाव करते. या उपायासाठी तांदूळ पाण्यात उकळून नंतर गाळून घ्या. आता हे पाणी म्हणजे स्टार्च स्प्रे बाटलीत भरा. २ ते ३ दिवस राहू द्या. त्यांनंतर तो स्प्रे सकाळ आणि रात्रीच्या स्किन केअर रुटीनमध्ये वापरा. काहीच दिवसांत तुम्हाला बदल दिसून येईल.

तांदळाचा घरगुती फेस मास्क

तांदूळ डेड स्किन काढून टाकण्यासोबतच त्वचेचा रंगही सुधारण्यास प्रचंड उपयोगी ठरते. यासाठी तांदळाचे पीठ आणि कोरफडीचे जेल आवश्यक आहे. दोन्ही घटकांचे मिश्रण तयार करा आणि चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावा. त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा सामान्य पाण्याने धुवा. रिपोर्ट्सनुसार, कोरियन मुली हे दोन्ही पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरतात. आठवड्यात ज्या दिवशी तुम्ही चेहऱ्याला मास्क लावता त्यावेळी मास्क म्हणून हेच मिश्रण वापरून पाहा. अगदी काहीच दिवसांत तुम्हाला त्वचेत बदल जाणवेल.

ग्रीन टीचा वापर

कोरियासोबतच भारतातदेखील अँटी-एजिंग, मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या टाळण्यासाठी ग्रीन टी हा सर्वोत्तम घटक मानला जातो. कोरियन मुली वेगवेगळ्या प्रकारे ग्रीन टी वापरतात. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. हा उपाय करण्यासाठी एक कप पाणी गरम करा आणि त्यात ग्रीन टी पूर्णपणे उकळवा. आता थंड होऊ द्या आणि फेसवॉशने चेहरा स्वच्छ करून या पाण्याने चेहरा पुन्हा धुवून घ्या. चेहऱ्याची पोत सुधारण्यासाठी आणि डाग घालवण्यासाठी दिवसातून दोनदा हा उपाय करा.

 

(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner