Pregnancy Tips: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३४ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री संपेल. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या वेळी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्यामध्ये पूजेपासून अन्न-पाणी न घेण्याच्या नियमापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. मात्र, यामागे वैज्ञानिक कारणही आहे. विशेषत: गरोदर महिलांना ग्रहण काळात काळजी घेण्यास सांगितले जाते.
> गर्भवती महिलांनी ग्रहणात झोपणे टाळावे. अगदी लहान झोपही गर्भातील बाळासाठी हानिकारक ठरू शकते.
> गर्भवती महिलांनी ग्रहणकाळात कोणत्याही प्रकारची तीक्ष्ण, टोकदार किंवा दुखावणारी वस्तू वापरू नये. जसे चाकूने कापणे किंवा सुईने शिवणे.
> श्रद्धेनुसार, ग्रहण काळात, गर्भवती महिलांना खाणे आणि पिण्यास पूर्णपणे परवानगी आहे, परंतु अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने घातल्यानंतरच ते खावे.
> तसेच, हिंदू धर्माचा असा विश्वास आहे की ग्रहणामुळे होणार्या कोणत्याही वाईट प्रभावापासून गर्भातील बाळाचे रक्षण करण्यासाठी, तुळशीच्या पानांचा रस पोटावर म्हणजेच गर्भावर लावावा.
> ग्रहण काळात गरोदर महिलांनी पाय दुमडून बसू नये.
> ग्रहण काळात घराबाहेर पडू नये आणि घराच्या आतही सूर्याच्या हानिकारक किरणांपासून दूर राहावे. घरात अशा ठिकाणी बसा जिथे थेट सूर्यप्रकाश पडत नाही.
> ग्रहणकाळात गरोदर स्त्रियांनी रागावणे व मनात वाईट विचार येणे टाळावे व आपल्या देवाचे स्मरण करावे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या