मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Know What Is The Right Time To Eat Apple

Health Tips: आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी चुकीच्या वेळी खाल्ल्याने नुकसान करते सफरचंद, पाहा कधी खावे

सफरचंद खाण्याची योग्य वेळ
सफरचंद खाण्याची योग्य वेळ (unsplash)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Sep 19, 2023 07:02 PM IST

Healthy Eating Tips: सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व आहे. हे खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. पण ते योग्य वेळी न खाल्ल्यास नुकसान होते. येथे जाणून घ्या सफरचंद खाण्याची योग्य वेळ.

Right Time To Eat Apple: सफरचंद हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काही अहवाल सांगतात की जे लोक रोज एक सफरचंद खातात ते आजारांपासून दूर राहतात. हे असे फळ आहे जे पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध मानले जाते. जरी हे खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण जर तुम्ही ते चुकीच्या वेळी खाल्ले तर त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. आम्ही तुम्हाला सफरचंद खाण्याची योग्य वेळ आणि कोणत्या वेळी सफरचंद खाऊ नये ते सांगत आहोत. जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

कधी खावे सफरचंद

आयुर्वेदानुसार सफरचंद खाण्याची योग्य वेळ ही रिकाम्या पोटी नाही. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी सफरचंद खाता तेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. नाश्ता केल्यानंतर एक तास किंवा दुपारच्या जेवणानंतर एक तासानंतर सफरचंद खाण्याची शिफारस केली जाते.

यावेळी चुकूनही खाऊ नका

संध्याकाळी पाचक आम्लाची पातळी कमी झाल्यामुळे पचनक्रिया मंदावते. अशा परिस्थितीत जर तुम्ही संध्याकाळी ६ नंतर सफरचंद खात असाल तर तुम्हाला पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे झोपायलाही त्रास होऊ शकतो.

 

कसे खावे सफरचंद

आपल्या आहारात सफरचंद समाविष्ट करण्याचे अनेक मार्ग आहेत. फक्त लक्षात ठेवा की सफरचंदाची साल कधीही काढू नका. कारण त्यात अनेक आवश्यक पोषक घटक असतात. याशिवाय पॅक केलेला सफरचंदाचा रस पिणे टाळा. त्यात साखर असते, जी आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)