Periods Problem: पीरियडच्या समस्येवर काय म्हणाली शार्क टँक इंडियाची नमिता थापर?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Periods Problem: पीरियडच्या समस्येवर काय म्हणाली शार्क टँक इंडियाची नमिता थापर?

Periods Problem: पीरियडच्या समस्येवर काय म्हणाली शार्क टँक इंडियाची नमिता थापर?

Mar 06, 2024 06:21 PM IST

Shark Tank India Season 3: "मला अॅनिमिया झाला होता. माझं हिमोग्लोबिन ८ (g/dl) वर गेलं," असं नमिता थापर म्हणाली. एका पीचदरम्यान ती तिच्या पीरियडच्या समस्येविषयी काय म्हणाली ते पाहा

शार्क टँक इंडिया सीझन ३ः नमिता थापर ही शार्क टँक इंडियातील शार्कपैकी एक आहे.
शार्क टँक इंडिया सीझन ३ः नमिता थापर ही शार्क टँक इंडियातील शार्कपैकी एक आहे.

Namita Thapar Talked About Period Problem: एमक्युर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी शार्क टँक इंडियावर पेरी-मेनोपॉजच्या अनुभवातून जाण्याविषयी सांगितले. आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना तिने सांगितले की, त्यावेळी तिला मासिक पाळीदरम्यान इतके ब्लिडिंग झाले होते की शार्क टँकचे शूटिंग करताना तिला बसायला सुद्धा खूप अनकंफर्टेबल वाटत होते. 

"मला अॅनिमिया झाला होता. माझे हिमोग्लोबिन ८ (g/dl) पर्यंत गेले होते," असे नमिका थापर हिने सांगितले. मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम देणारे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तयार करणाऱ्या मात्रीच्या फाउंडरच्या पिचदरम्यान तिने तिचा अनुभव सांगितला.

ती म्हणाली, "पेरिमेनोपॉज सहसा वयाच्या ४० मध्ये सुरू होतो. आपल्याला मूड स्विंग्स, निद्रानाश, हॉट फ्लॅशेस आणि इतर अनेक लक्षणे आढळतात. बऱ्याच स्त्रियांना लक्षणे, उपचार पर्यायांबद्दल माहिती नसते आणि हा त्यांच्या जीवनातील एक अतिशय खडतर आणि व्यत्यय आणणारा टप्पा असू शकतो. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हा कठीण काळ होता. माझा प्रवास शेअर करण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी मात्री पिचचा वापर करताना मला आनंद झाला.

सोशल मीडिया युजरनी नमिता थापर यांचे कौतुक केले. एका एक्स (पूर्वीचे ट्विटर) युजरने लिहिले की, "एक उद्योजक असल्याने तुझ्याकडे या समस्येबद्दल बोलण्याची हिंमत आहे. परंतु लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी वैद्यकीय उद्योग या समस्येचा फायदा घेत आहे. मी तुझा खूप आदर करतो." तर एकाने कमेंट केली की, "वैयक्तिक अनुभवाच्या पीओव्हीमधून याबद्दल बोलण्यासाठी खूप हिंमत लागते. ग्रेट." तिसऱ्या युजरने लिहिलं की, 'बहुतेक मुलींना 'पेरीमेनोपॉज'बद्दल माहितीही नसते. याचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा, जेणेकरून महिलांना या टप्प्याची चांगली माहिती होईल.

Whats_app_banner