वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूलमध्ये मजा करायची आहे? लक्षात ठेवा हे सेफ्टी रूल
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूलमध्ये मजा करायची आहे? लक्षात ठेवा हे सेफ्टी रूल

वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूलमध्ये मजा करायची आहे? लक्षात ठेवा हे सेफ्टी रूल

HT Marathi Desk HT Marathi
Published May 16, 2025 06:13 PM IST

स्विमिंग पूल आणि वॉटर पार्कमध्ये उन्हाळ्यात चिल करण्यासाठी जात असाल तर हा एक सेफ्टी रूल नक्की जाणून घ्या. हे आपल्याला खोल पाण्यात बुडणे टाळण्यास आणि मदतीसाठी ओरडण्यास मदत करेल.

बुडण्यापासून वाचण्यासाठी सेफ्टी रूल
बुडण्यापासून वाचण्यासाठी सेफ्टी रूल (shutterstock)

Safety Rule For Water Park or Swimming Pool: उन्हाळ्यात वॉटर पार्क आणि स्विमिंग पूल ही सर्वात चिल करणारे ठिकाणे बनतात. जिथे लोक मुलं आणि कुटुंबासोबत मौजमजा करायला नक्कीच जातात. पण काही लोकांसाठी ही मजा शिक्षा ठरते. कारण त्यांना काही सुरक्षा नियमांची माहिती नसते. जर तुम्ही पाणी असलेल्या ठिकाणी उन्हाळ्याचा आनंद लुटणार असाल आणि पोहायला येत नसेल तर हा नियम बुडण्यापासून वाचण्यास मदत करेल. त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

सुरक्षिततेचे नियम जाणून घेणे महत्वाचे

पूल किंवा वॉटर पार्कमध्ये जाणाऱ्या सर्व लोकांना पोहणे येत नाही. अशावेळी बुडू नये म्हणून सुरक्षेच्या काही नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

फॉलो करा सेफ्टी रूल

वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूलमध्ये जात असाल तर जवळ उपस्थित असलेल्या इन्स्ट्रक्टरच्या सूचनांचे अवश्य पालन करा. तसेच सेफ्टी किट सोबत ठेवा. लहान मुलांसाठी रबर ट्यूब आणि हँड ट्यूब घाला. त्याचबरोबर मोठ्यांचीही काळजी घ्या.

खोल पाण्यात जाणे टाळा

पोहायला येत नसेल तर आपल्या उंचीपेक्षा जास्त खोली असलेल्या पूलमध्ये जाऊ नका. एवढ्या खोल पाण्याच्या भागात जाणे पूर्णपणे टाळा. कारण थोडासा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.

जाणून घ्या बुडण्यापासून वाचण्याचा हा नियम

पोहायला येत नसेल आणि तुम्ही खोल पाणी असलेल्या ठिकाणी पोहोचला असाल तर पॅनिक होऊ नका. आपले हात पाण्याखाली ठेवा. जेव्हा आपले हात पाण्याखाली असतील तेव्हा आपले डोके बाहेर राहील आणि आपण बुडणे टाळाल. त्याचबरोबर आरडाओरडा करून स्वत:ला वाचवण्यासाठी मदत मागू शकाल. जर आपले पाय पूलच्या तळाशी किंवा लेव्हलवर पोहोचत नसेल तर आपला हात आत ठेवा आणि आपले पाय हलवा. जेणेकरून तुम्ही झोपलेल्या अवस्थेत याल. या स्थितीत तुम्ही किनाऱ्यावर सहज पोहू शकाल. पण जर तुम्ही आपले हात वरच्या दिशेने उचलून पाण्याबाहेर काढले तर तुम्ही लगेच बुडू लागाल आणि मदत मागू शकणार नाही.

त्यामुळे जर तुम्हाला पोहायला येत नसेल आणि तुम्ही पूल किंवा वॉटर पार्क सारख्या ठिकाणी जात असाल तर बुडू नये म्हणून हा बेसिक नियम नक्की लक्षात ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner