Chanakya Niti: कोणाशीही मैत्री करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या!
Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नातेसंबंध, नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस आपले जीवन यशस्वी करू शकतो. आजही अनेक लोक या धोरणांचे पालन करतात. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये मैत्रीशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मैत्री करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी.
ट्रेंडिंग न्यूज
आंधळेपणाने विश्वास ठेवू नका
कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कोणाला मित्र बनवण्यापूर्वी त्या व्यक्तीला नीट समजून घ्या. तुम्ही असे न केल्यास आणि ती व्यक्ती नीट नसल्यास तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.
वाईट कामात साथ देऊ नका
अशा व्यक्तीशी मैत्री करू नका जी तुम्हाला चुकीच्या कामात साथ देईल. लक्षात ठेवा खरे आणि चांगले मित्र तुम्हाला वाईट गोष्टींबद्दल नेहमी समजावून सांगतील आणि तुमचे समर्थन करणार नाहीत.
संकटात साथ द्या
अशा व्यक्तीशी मैत्री करा जी तुम्हाला संकटात साथ देईल. अशा व्यक्तीशी कधीही मैत्री करू नका जो तुम्हाला अडचणीच्या वेळी सोडून जाईल.
संशोधन करा
कोणत्याही व्यक्तीला मित्र बनवण्यापूर्वी त्याच्याबद्दल थोडे संशोधन करा. असे होऊ नये की, मैत्री केल्यावर तो कोणत्याही संकटाचे कारण बनेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. )