मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  New Year Resolution Mistakes: नवीन वर्षाचे संकल्प सेट करताना अनेकदा होतात या चुका

New Year Resolution Mistakes: नवीन वर्षाचे संकल्प सेट करताना अनेकदा होतात या चुका

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 22, 2023 08:40 PM IST

New Year Resolution 2024: नवीन वर्षात अनेक जण काहीना काही संकल्प करतात. पण अनेकदा हे संकल्प करताना काहा चुका होतात. या चुका कोणत्या आहेत ते पाहा.

नवीन वर्षाचे संकल्प सेट करताना होणाऱ्या चुका
नवीन वर्षाचे संकल्प सेट करताना होणाऱ्या चुका (unsplash)

New Year Resolution Mistakes: नवीन वर्ष म्हटले की लोक स्वतःमध्ये बदल करण्यासाठी अनेक संकल्प करतात. वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी आपल्यातील एकादी सवय बदलायची असेल किंवा चांगली सवय लावायची असेल तर त्यासाठी स्वतःला वचन दिले जाते. पण यातील किती संकल्प वर्षभर पाळली जातात हा प्रश्न आहे. अनेक संकल्प हे नवीन वर्षाच्या १०-१५ दिवसातच संपतात आणि लोक पुन्हा त्याच जुन्या रुटीनमध्ये येतात. तुम्हाला खरोखरच प्रामाणिकपणे घेतलेला संकल्प पूर्ण करायचा असेल तर संकल्प सेट करताना या चुका करू नका.

ट्रेंडिंग न्यूज

संकल्प जरूर लिहा

तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी, यशासाठी किंवा इतर कशासाठीही संकल्प करताना सर्वात मोठी चूक म्हणजे तो लिहून न ठेवणे. आपले ध्येय नेहमी लिहा. याच्या मदतीने तुम्ही त्यांना नेहमी लक्षात ठेवू शकाल. आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

स्वतःला बक्षीस देणे महत्त्वाचे

अनेकदा लोक संकल्प किंवा ध्येय सेट करताना बक्षीस सेट न करण्याची चूक करतात. जर तुम्ही स्वत:ला फिट ठेवण्याचा संकल्प घेत असाल, तर इच्छित शेप किंवा इंचांमध्ये येण्यासाठी काही बक्षीस सुद्धा सेट करा. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला प्रेरित करू शकाल आणि तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल. तुमचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी छोटेसे बक्षीस देखील ट्रॉफीपेक्षा कमी नसेल. त्यामुळे संकल्प करताना सोबत एखादे बक्षिस सेट करा.

लिहिण्यात कंजूषी करू नका

जेव्हा तुम्ही संकल्प सेट करता तेव्हा फक्त संकल्प लिहू नका तर स्वत:साठी एक कालमर्यादाही ठरवा. जसे तुम्हाला तुमचे करिअर घडवायचे असेल, तर चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वत:साठी वेळ निश्चित करा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. किंवा वजन कमी करताना किती वेळात किती किलो वजन कमी करायचे आहे हे सुद्धा लिहा. जेणेकरुन वेळोवेळी संकल्प पाहून तुम्ही आतापर्यंत किती ध्येय पूर्ण केले आहे हे कळू शकेल.

 

शेअर करा

संकल्प सेट करताना आपण सहसा आपल्यासोबत कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा समावेश करत नाही. ही सर्वात मोठी चूक आहे. जेव्हाही तुम्ही कोणताही संकल्प करता तेव्हा कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत तो शेअर करा. जेणेकरून तो तुम्हाला आठवण करून देऊ शकेल आणि तुमचा संकल्प पूर्ण झाला की नाही याची चौकशी करू शकेल. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एखाद्या सोबत घेतल्याने सहज पूर्ण करता येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग