Cooking Oil: जेवण बनवताना 'हे' तेल वापरताय? वेळीच सावध व्हा! आजच काढा किचनच्या बाहेर!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Oil: जेवण बनवताना 'हे' तेल वापरताय? वेळीच सावध व्हा! आजच काढा किचनच्या बाहेर!

Cooking Oil: जेवण बनवताना 'हे' तेल वापरताय? वेळीच सावध व्हा! आजच काढा किचनच्या बाहेर!

Published Jul 12, 2024 01:05 PM IST

Health Care Tips: जेवण बनवण्यासाठी या तेलांचा वापर केल्याने लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित आजार, सांधेदुखी आणि जळजळ यासह अनेक समस्या उद्भवू शकतात. कोणते कुकिंग ऑइल आरोग्यासाठी घातक आहेत ते पाहा.

आरोग्यासाठी घातक असलेले कुकिंग ऑइल
आरोग्यासाठी घातक असलेले कुकिंग ऑइल (pexels)

Worst Cooking Oil for Health: स्वादिष्ट जेवण कोणाला नको असते? एखादी नवीन रेसिपी पाहिली की ती लगेच ट्राय करून पाहण्याचा मोह प्रत्येक स्त्रीला होतो. पण चवीबरोबरच जेव्हा विषय आरोग्याचा येतो तेव्हा कुठल्याच स्त्रीला आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी तडजोड करायला आवडत नाही. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे कुकिंग ऑइल चवीसोबतच आरोग्य राखण्याचा देखील दावा करतात. पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. जेवण बनवण्यासाठी या कुकिंग ऑइलचा वापर केल्यास लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित आजार, सांधेदुखी आणि जळजळ, सूज यासह अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया असे कुकिंग ऑइल जे आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतात.

पाम तेल

पाम तेलात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. यात सुमारे ५० टक्के सॅच्युरेटेड फॅट असते. सॅच्युरेटेड फॅट "खराब" कोलेस्ट्रॉल नावाच्या एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. हाय एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेग तयार होऊ लागतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

सोयाबीन तेल

सोयाबीन तेलात ओमेगा ६ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. अशा वेळी या तेलाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास सांधेदुखी आणि सूज वाढू शकते.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईलचा वापर ड्रेसिंग किंवा डिप्स बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. सलाद, चटणी, पास्ता, पिझ्झा मध्ये कच्चे सर्व्ह करता येते. पण ते जास्त आचेवर जेवण बनवम्यासाठी योग्य नाही. हाय फ्लेमवर कुकिंग केल्याने केवळ अतिसाराची समस्या उद्भवत नाही तर त्वचेवर मुरुम आणि लाल पुरळ देखील उद्भवू शकतात.

व्हेजिटेबल ऑइल

जर तुम्ही सुद्धा स्वयंपाकासाठी वनस्पती तेल वापरत असाल तर मका, सूर्यफूल आणि सोयाबीनच्या मिश्रणापासून बनवलेल्या तेलात ओमेगा ६ फॅटी अॅसिड जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात जळजळ, सूज होऊ शकते. या तेलाच्या जास्त सेवनाने हृदयात ब्लॉकेज होण्याचा सुद्धा धोका असतो.

कॉटन सीड ऑइल

कॉटन सीड ऑईलमध्ये ओमेगा ६ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, ज्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास जळजळ, एलर्जी, त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, डोळ्यांची जळजळ किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. इतकंच नाही तर आहारात ओमेगा ६ फॅटी अॅसिडचं जास्त सेवन केल्यास मधुमेही रुग्णांना उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner