Winter Skin Care: हिवाळ्यात हवी ग्लोइंग स्किन? चेहऱ्यावर अशा प्रकारे वापरा आवळा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Skin Care: हिवाळ्यात हवी ग्लोइंग स्किन? चेहऱ्यावर अशा प्रकारे वापरा आवळा

Winter Skin Care: हिवाळ्यात हवी ग्लोइंग स्किन? चेहऱ्यावर अशा प्रकारे वापरा आवळा

Dec 18, 2023 12:12 PM IST

Skin Care With Amla: आरोग्यासाठी फायदेशीर असणारा आवळा केस आणि त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात त्याचा वापर कसा करावा ते जाणून घ्या.

हिवाळ्यात स्किन केअरसाठी आवळा वापरण्याची पद्धत
हिवाळ्यात स्किन केअरसाठी आवळा वापरण्याची पद्धत (unsplash)

Ways To Use Amla For Glowing Skin: आरोग्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. प्रत्येक ऋतूत आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. हे जसे तुमचे आरोग्य सुधारते तसेच ते तुमची त्वचा आणि केस देखील सुधारते. त्वचेवरील हट्टी डाग काढून टाकणे, रंग उजळवणे अशा विविध गोष्टींसाठी तुम्ही आवळा वापरू शकता. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. अनेक लोकांना रोज आवळा खाणे आवडते. तुम्ही घरच्या घरी अनेक देशी पद्धतीने आवळा वापरू शकता आणि तुमचे सौंदर्य वाढवू शकता. हिवाळ्यात चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी आवळा वेगवेगळ्या प्रकारे कसा वापरायचा ते जाणून घ्या.

हिवाळ्यात स्किन केअरमध्ये आवळा वापरण्याची पद्धत

- जर तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये आवळा फेस पॅकचा समावेश जरूर करा. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका वाटीत २ चमचे आवळा पावडर, दही आणि गुलाब जल मिक्स करा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

- वाढत्या वयाबरोबर त्वचेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी सुद्धा आवळ्याचा वापर केला जाऊ शकतो. आवळा चेहऱ्याच्या मसाजसाठीही वापरता येतो. फेस मसाजसाठी १ चमचा आवळ्याच्या रसात १ चमचा बदामाचे तेल मिक्स करा. त्यानंतर सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाने चेहऱ्याला नीट मसाज करा. १५ मिनिटे हे चेहऱ्यावर राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ करा.

- सुरकुत्या आणि ब्लॅकहेड्सची समस्या टाळण्यासाठी तुमची त्वचा रोज स्क्रब करा. तुम्ही आवळ्यापासून घरी स्क्रब बनवू शकता. यासाठी दोन कच्चे आवळे बारीक करून पेस्ट बनवा. नंतर त्यात अर्धा चमचा मध घाला. दोन्ही मिक्स केल्यानंतर त्यात १ चमचा ग्रीन टी घाला. या मिश्रणाने चेहरा नीट स्क्रब करा. रंग सुधारण्यासाठी हे बेस्ट होममेड स्क्रब आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner