Use and Benefits of Khas Khas: किचनमध्ये अनेक पदार्थ, थंडाईमध्ये खसखस वापरले जाते. होळीच्या काळात बनवले जाणारे थंडाई, गुजियामध्ये खसखस आवर्जून टाकली जाते. उत्तर प्रदेशात होळीच्या दरम्यान याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी ऐरवी सुद्धा मसाल्यामध्ये खसखस वापरली जाते. खसखस एक असा मसाला आहे, ज्याचे छोटे दाणे जेवणाची चव दुप्पट करतात. या बिया सुगंधी असून शरीराला थंडावा देतात. ते सरबत, रस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरले जाते. हलवा, खीर आणि बर्फी इत्यादी व्यतिरिक्त ब्रेड, केक यासारख्या बेक्ड गोष्टींमध्ये देखील याचा वापर केला जातो. गोड पदार्थांव्यतिरिक्त भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या आहारात ते कोणत्या प्रकारे वापरू शकता ते येथे जाणून घ्या.
- दम आलू, पनीर मखनी किंवा वांगी इत्यादी ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये वापरण्यासाठी खसखस रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. मग पाणी काढून टाकल्यावर भिजवलेले काजू किंवा बदामसोबत मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्या. ग्रेव्ही मसाला घालून भाजून घ्या आणि नंतर भाज्या आणि पाणी घाला. ग्रेव्ही क्रीमी आणि स्वादिष्ट बनते.
- कोरडी पावडर म्हणून वापरण्यासाठी खसखस स्वच्छ करून घ्या. ओल्या कापडाने पुसा. थोडा गरम करा आणि पावडर बनवा. हे तुम्ही थंडाई पूड किंवा खीर, हलवा इत्यादीं मध्ये घालता येते. याशिवाय गरम मसाल्यातही वापरता येते.
- खसखस स्वच्छ करा, ओल्या कापडाने पुसून टाका आणि ओलावा पूर्णपणे निघेपर्यंत गरम करा. आता ब्रेड रोल, पुरीचे पीठ किंवा बेक्ड पदार्थांवर लावा.
- गुजियाच्या मिश्रणात तुम्ही खसखसही घालू शकता. याशिवाय जेव्हा नमकीन चिवडा बनवायचा असतो तेव्हा त्यातही काही प्रमाणात घालता येते.
- बर्फीवरील सजावटीसाठी स्प्रेड करण्यासाठी, सलाद, पास्ता इत्यादींमध्ये खसखस वापरल्याने केवळ चवच नाही तर आरोग्यालाही फायदा होतो.
- शिंगाडा किंवा कुट्टूचे पीठ पाण्यात मिसळून बनवलेली पंजिरी खूप छान लागते. पुरी आणि मठरी इत्यादींच्या वर खसखस शिंपडा आणि हलक्या हाताने दाबा. पुरी आणि मठरीचा लुक सुंदर होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)