Foods for Thyroid: थायरॉईड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात हे सुपर फूड्स, लगेच करा आहारात समावेश
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Foods for Thyroid: थायरॉईड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात हे सुपर फूड्स, लगेच करा आहारात समावेश

Foods for Thyroid: थायरॉईड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात हे सुपर फूड्स, लगेच करा आहारात समावेश

Mar 10, 2024 01:35 PM IST

Women Health Tips: थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी काही पदार्थ चांगले म्हटले जातात. यांचा तुम्ही आहारात समावेश केला पाहिजे.

थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी सुपर फूड्स
थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी सुपर फूड्स

Super Foods Good For Thyroid Health: थायरॉईड ही महिलांमध्ये सामान्य समस्या आहे. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही वयात ही समस्या निर्माण होऊ शकता. दुर्दैवाने सध्या या आजारावर कायमस्वरूपी इलाज नाही. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यक्तीने आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. थायरॉइड ही एक फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे जी मानेत असते आणि जी थायरॉईड ग्रंथी बनवते. या हार्मोनच्या कमी-जास्त उत्पादनामुळे शरीरात अनेक गंभीर समस्या दिसू शकतात.

थायरॉईडचे दोन प्रकार

हायपरथायरॉईडीझम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो, तर हायपोथायरॉईडीझम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये ग्रंथी फारच कमी प्रमाणात तयार होते किंवा या हार्मोनची निर्मिती थांबवते. आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार सावलियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि अशा काही पदार्थांबद्दल सांगितले आहे जे थायरॉईड नियंत्रित करतात.

थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ५ सुपर फूडचा करा आहारात समावेश

आवळा

आवळा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा आठपट जास्त आणि डाळिंबापेक्षा सतरा पट जास्त व्हिटॅमिन सी असते. हे थायरॉईड नियंत्रित करण्यास आणि केस, त्वचा आणि ऊर्जा पातळी सुधारण्यास मदत करू शकते. तुम्ही ते फळ, पावडर, रस, कँडी या स्वरूपात घेऊ शकता.

मूग डाळ

थायरॉईडच्या रुग्णांसाठी प्रथिने पचायला सर्वात सोपी असते. मूग डाळीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील आयोडीनची कमतरता दूर करून पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करते.

तूप

तूप त्वचा आणि केसांचा कोरडेपणा कमी करून हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते. थायरॉईडचे रुग्ण ते दररोज त्यांच्या जेवणात तूप खाऊ शकतात.

नारळ

थायरॉईडच्या रुग्णांसाठी नारळ हे सर्वोत्तम अन्न मानले जाते. नारळाचे तेल हळूहळू चयापचय सुधारते. वास्तविक नारळात मीडियम चेन फॅटी अॅसिडस् (MCFAs) आणि मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स (MTCs) असतात, जे चयापचय सुधारतात. थायरॉईड कार्यासाठी हे सर्वोत्तम फॅट आहे. तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी करू शकता. तसेच नारळ म्हणजे खोबरं सुद्धा तसेच खाऊ शकता.

ब्राझील नट्स

ब्राझील नट्समध्ये सेलेनियम असते, जे थायरॉईड कार्यासाठी आवश्यक मानले जाते. थायरॉईड संप्रेरक टी३ च्या निर्मितीसाठी ब्राझील नट्समध्ये उपस्थित सेलेनियम आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ते थायरॉईडचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. अशा प्रकारे ब्राझील नट्स थायरॉईडचे कार्य सुधारतात. तुम्ही सकाळी २-३ ब्राझील नट्स वापरू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner