Winter Skin Care Tips for Dry skin: हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे ही खूप सामान्य समस्या आहे. तापमानात घट आणि हवेत ओलावा नसल्यामुळे हे घडते. पण त्वचा कोरडी होण्यामागे फक्त हे एकच कारण नाहीये. तर हिवाळ्यात तहान कमी लागल्याने पाणी कमी प्यायल्याने सुद्धा त्वचा कोरडी होते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर मिल्क-क्रीम किंवा चांगली क्रीम लावून गमावलेली चमक परत मिळवता येते. परंतु काही वेळा इतर काही कारणांमुळे त्वचा खराब होऊ लागते आणि ती जास्त कोरडी होऊन सोलणे सुरू होते. असे होऊ नये म्हणून हिवाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळ्यात त्वचा का सोलते आणि त्याची कशी काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
औषधांचे सेवन - त्वचेला काही औषधांचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. रक्तदाबाची औषधे, एपिलेप्सी सारखी औषधे इत्यादीच्या सेवनाने त्वचेवर परिणाम होऊ शकतो.
उन्हााच प्रभाव - संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांची त्वचा सूर्याची तीव्र किरण जास्त काळ सहन करू शकत नाही. परिणामी पुरळ, लालसरपणा, सूज आणि त्वचा सोलणे यासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात जास्त काळ उन्हात राहिल्याने हे होऊ शकते.
सोरायसिस आणि एक्जिमा - हे दोन्ही त्वचेचे रोग आहेत, ज्यामध्ये त्वचेवर लाल, तपकिरी किंवा पांढरे चट्टे दिसतात आणि त्वचा प्रभावित भागातून सोलायला लागते. या स्थितीत दुखण्यासोबतच खाज येण्याची समस्याही त्रास देते.
स्पायनल स्किन सिंड्रोम - हा एक दुर्मिळ त्वचा रोग आहे, ज्यामध्ये त्वचेवर लालसरपणा आणि सूज आल्यानंतर त्या ठिकाणाहून त्वचा सोलायला लागते.
पोषणाचा अभाव - शरीरात व्हिटॅमिन बी-३ किंवा व्हिटॅमिन-ए च्या विषारीपणामुळे त्वचेवर परिणाम होऊन साल निघू शकते.
एलर्जीची समस्या - कधी कधी नवीन कॉस्मेटिक वापरल्याने त्वचेवर एलर्जी होते. अनेक लोकांना हेअर कलर किंवा क्रीम बदलल्यामुळे त्वचेवर जळजळ, सूज आणि पुरळ येऊ शकतात. काळजी न घेतल्यास त्वचाही सोलू शकते.
तसेच खूप गरम पाण्याने आंघोळ करणे, जास्त घासणे किंवा स्वच्छतेची काळजी न घेतल्याने खाज येण्याबरोबरच त्वचा सोलू शकते. याशिवाय हायपोथायरॉईडीझम किंवा कोणत्याही प्रकारच्या फंगल इंफेक्शनमुळे सुद्धा त्वचेचे नुकसान होऊ शकते.
प्रत्येक ऋतूत त्वचेची काळजी घेणे आवश्यक असले तरी हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. यावर उत्तम उपाय म्हणजे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये आवश्यक बदल करणे.
साबणाला नाही म्हणा- साबणामध्ये कॉस्टिक सोडासह अनेक रसायने असतात, जे त्वचेचे नैसर्गिक तेल आणि ओलावा काढून टाकतात. साबणाऐवजी फोम किंवा क्रीम बेस क्लिंजर वापरा.
चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर - तुमच्या त्वचेनुसार चांगल्या ब्रँडचा मॉइश्चरायझर निवडा. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावणे चांगले असते. कारण ओलसर त्वचा ते अधिक चांगल्या प्रकारे शोषू शकते.
ओलावा लॉक करा - फक्त एक विंटर क्रीम लावून त्वचेची संपूर्ण काळजी घेतली जाऊ शकत नाही. योग्य टेक्निक वापरून स्किन केअर प्रोडक्ट लागू करा. जसे फेस सीरम लावल्यानंतर त्यावर तुमचे आवडते मॉइश्चरायझर लावा आणि शेवटी बॅरियर रिपेअर क्रीम वापरा.
सनस्क्रीनचा वापर - उन्हाळ्यातच सनस्क्रीनची गरज आहे असा विचार करणे चुकीचे आहे. कारण हिवाळ्यातही सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यातही नियमितपणे एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरा.
चेहरा वारंवार धुवू नका - चेहऱ्यावरील धूळ काढण्यासाठी तुमचा चेहरा वारंवार धुवू नका. कारण यामुळे त्वचा अधिक कोरडी होईल. त्याचप्रमाणे वारंवार पाण्यात हात बुडवू नका आणि प्रत्येक वेळी हात धुतल्यावर हँड क्रीम लावा.
ऋतूनुसार प्रोडक्टमध्ये बदल - रेटिनॉल आणि ओए असलेली अँटी-एजिंग प्रोडक्ट हिवाळ्यात कोरडी त्वचा आणखी कोरडी करू शकतात. स्किन एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार त्यांच्या वापरामध्ये बदल करा.
सिलिकॉन फेस स्क्रब - त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी नियमित स्क्रबिंग करणे खूप महत्वाचे आहे. पण हे नीट न केल्याने त्वचा सोलते. अशा परिस्थितीत सिलिकॉन स्क्रबचा वापर करून त्वचेला इजा न करता डेड स्किन काढता येते. हे स्क्रब केवळ त्वचेला डीप क्लिन करत नाही तर ते तुम्ही संपूर्ण शरीरातील डेड स्किन काढण्यासाठी सुद्धा वापरू शकता.
- जास्त गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करा.
- आंघोळीच्या पाण्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळल्याने त्वचा मुलायम राहते.
- आठवड्यातून दोनदा अंघोळ करण्यापूर्वी कोरड्या मऊ टॉवेलने शरीराला कोरडी मसाज करा. त्यामुळे मृत त्वचा निघून जाईल.
- व्हिटॅमिन ई असलेल्या तेलाने शरीराला मसाज करा.
- गरम दुधात बदाम रोगनचे काही थेंब टाकून ते प्या. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)