Poor Nutrition: शरीरातील या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, दर्शवते आवश्यक पोषणाचा अभाव
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Poor Nutrition: शरीरातील या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, दर्शवते आवश्यक पोषणाचा अभाव

Poor Nutrition: शरीरातील या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, दर्शवते आवश्यक पोषणाचा अभाव

Jul 08, 2024 12:29 AM IST

Signs of Poor Nutrition: शरीरात काही समस्या आणि वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा हे शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होते.

पोषणाचा अभाव असल्याचे लक्षण
पोषणाचा अभाव असल्याचे लक्षण (unsplash)

Symptoms of Nutrition Deficiency: आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या पोषणाची गरज असते. जेव्हा त्यापैकी एक कमी असते, तेव्हा शरीर त्वरित प्रतिक्रिया देते. पण अनेकदा शरीराच्या या प्रतिक्रिया समजून घेण्यात आपण चूक करतो किंवा उशीर करतो. ज्यामुळे आवश्यक पोषणाच्या कमतरतेमुळे आजार होऊ लागतात. जर आपण वारंवार जांभई घेत असाल किंवा जास्त थंडी जाणवत असेल तर शरीरातील या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी जाणून घ्या या समस्या कशामुळे उद्भवतात.

वारंवार जांभई येते

झोपेच्या कमतरतेमुळे जांभई येणे खूप सामान्य आहे. जर एखाद्याने झोप पूर्ण केली नसेल किंवा शरीरात खूप थकवा येत असेल तर जांभई येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण थकवा आणि अशक्तपणामुळे जर तुम्ही नेहमी आणि वारंवार जांभई येत असाल तर ते शरीरातील लोहाच्या कमतरतेचे संकेत देते.

सतत हात पायाच्या स्नायूंमध्ये वेदना

जर तुमच्या हात पायाच्या स्नायूंमध्ये दुखत असेल किंवा थोडं काम केल्यानंतर जर शरीर दुखू लागलं तर ते मॅग्नेशियमची कमतरता दर्शवते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेकदा शरीरात तीव्र वेदना होतात. स्नायूंना क्रॅम्प जाणवतात.

हात-पायात मुंग्या येणे

हात-पायात मुंग्या आल्यासारखे वाटत असेल तर ही लक्षणे व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दर्शवतात. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होते. ज्यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो आणि व्यक्तीला नैराश्यासारख्या समस्याही होऊ लागतात.

हाडांचे दुखणे

जर सतत पाठ दुखत असेल किंवा पायात दुखत असेल तर ते शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. केवळ हाडांचे दुखणेच नव्हे तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वारंवार होणारे आजार, अतिचिंता, नैराश्य होण्यासोबतच आणि दुखापतीच्या जखमा लवकर बरे होत नाहीत.

जास्त थंडी जाणवणे

सामान्य लोकांपेक्षा जास्त थंडी जाणवत असेल, शरीराचे तापमान कमी असेल तर ते आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या हायपोथायरॉईडचे लक्षण आहे. कधी कधी रक्ताची कमतरता, मधुमेह आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता हे देखील थंडीचे कारण असते. तथापि ही लक्षणे योग्य पोषणाचा अभाव दर्शवित नाहीत. याची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. जेणेकरून योग्य पोषक तत्वांची पूर्तता करता येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner