Side Effects of Eating Too Much Watermelon: उन्हाळ्यात अशी अनेक फळे उपलब्ध आहेत, जी चवीला खूप रसदार आणि गोड तर असतातच पण शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवतात. या फळांचे नियमित सेवन केल्यास व्यक्ती अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहते. असेच एक फळ म्हणजे टरबूज. टरबूजमध्ये ९० टक्के पाणी असते. सोबतच यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि लाइकोपीन आणि सिट्रुलीन सारखी प्लांट केमिकल असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. असे असूनही डॉक्टरांच्या मते, टरबूजचे जास्त सेवन केल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. जाणून घ्या जास्त प्रमाणात टरबूज खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात.
टरबूजमध्ये मुबलक पाणी असल्यामुळे पचनसंस्थेमध्ये गॅस, ब्लोटिंग आणि डायरिया सारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषत: ज्या लोकांची पचनसंस्था संवेदनशील आहे त्यांनी जास्त प्रमाणात टरबूज खाणे टाळावे.
टरबूजमध्ये ९० टक्के पाणी आणि भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला जुलाब, सूज आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय सॉर्बिटॉल नावाचे साखरेचे संयुग टरबूजात असते. ज्यामुळे लूज मोशन आणि गॅस होऊ शकतो.
टरबूजमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात टरबूज खाणे टाळावे. टरबूज जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्यांची ग्लुकोज पातळी वाढू शकते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी टरबूज खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गरजेपेक्षा जास्त टरबूज खाल्ल्याने व्यक्तीला ओव्हर हायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. ओव्हर हायड्रेशन म्हणजेच वॉटर इंटॉक्सिकेशन, ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होते. ज्यामुळे सोडियमचे प्रमाण कमी होऊ लागते. परिणामी इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडू होऊ शकते. हे अतिरिक्त पाणी बाहेर न आल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि व्यक्तीला पाय सुजणे, डोकेदुखी, स्नायू कमकुवत होणे आणि किडनीचा त्रास होऊ लागतो.
तुम्हाला टरबूजची एलर्जी असली तर त्याचे सेवन टाळा. एलर्जी झाल्यास त्वचेवर खाज येणे, सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या