Kitchen Tips: जळलेली कढई साफ करण्याचे रहस्य जाणून घ्या, फॉलो करा या टिप्स!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: जळलेली कढई साफ करण्याचे रहस्य जाणून घ्या, फॉलो करा या टिप्स!

Kitchen Tips: जळलेली कढई साफ करण्याचे रहस्य जाणून घ्या, फॉलो करा या टिप्स!

Mar 23, 2024 04:42 PM IST

How To Clean Burn Kadhai: किचनमधली चमकणारी भांडी सगळ्यांनाच आवडतात, पण कधी-कधी ती वापरामुळे काळी पडतात. यावेळी काही टिप्स फॉलो करून पुन्हा नव्या सारखी चमक तुम्ही मिळवू शकता.

Know the secret to cleaning a burnt pan follow these tips
Know the secret to cleaning a burnt pan follow these tips (freepik)

Kitchen Tips in Marathi: अनेकदा लोक रोजचा स्वयंपाक करण्यासाठी तीच तीच भांडी वापरतात. तर कधी दूध उकळण्यासाठी गॅसवर ठेवतात आणि विसरतात. यामुळे दूध उतू गेल्यावर पातेलं खराब होतं. पुष्कळ वेळा पुरी बनवल्यावर किंवा काही तळल्यावर कढई जळली जाते. जळलेली काळी भांडी साफ करणे ही हा एक मोठा टास्क बनवून जातो. जळलेले तेल भांड्याला चिकटले की ते काढायला तासन् तास घासावे लागतात. जर भांडे थंड झाले तर हे काम आणखी कठीण होते. बहुतेक महिला भांड्यांच्या काळपटपणामुळे त्रस्त होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही हीच समस्या असेल तर आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत. जळलेली कढई कशी स्वच्छ कराची याबद्दल जाणून घ्या.

जाणून घ्या हे मार्ग

> सर्वप्रथम जळलेल्या भांड्यात पाणी भरून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवावे.

> एक चमचा वापरून गरम पाण्याने जळलेल्या पॅनमधून थर काढण्याचा प्रयत्न करा.

> अशा प्रकारे भरपूर ग्रीस निघेल. पाणी पूर्णपणे उकळू द्या.

Cleaning Hacks: फॉलो करा क्लिनिंग हॅक, चमकेल घराचा प्रत्येक कोपरा!

> आता पाणी काही वेळ थंड होण्यासाठी सोडा आणि नंतर पुन्हा चमच्याने हलके खरवडून स्वच्छ करा.

> आता सँड पेपर घ्या आणि जळलेल्या तव्यावर घासून स्वच्छ करा आणि उरलेला डिश धुण्याचा साबण लावा.

> त्यावर थोडेसे घासल्यास भांड पूर्णपणे स्वच्छ होते आणि नवीन दिसू लागते.

Washing Machine Cleaning Tips: या टिप्समुळे वॉशिंग मशिन होईल साफ, रिपेयरिंगची गरज भासणार नाही!

> जर तुमच्याकडे सॅन्ड पेपर नसेल तर तुम्ही जुने वापरलेले फॉइल पेपर देखील वापरू शकता.

> जळलेली भांडीही फॉइल पेपरच्या मदतीने सहज साफ करता येतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner