Egg Hair Mask: केस गळतीपासून आराम देईल अंड्याचा हा हेअर मास्क, ही आहे बनवण्याची योग्य पद्धत आणि फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Egg Hair Mask: केस गळतीपासून आराम देईल अंड्याचा हा हेअर मास्क, ही आहे बनवण्याची योग्य पद्धत आणि फायदे

Egg Hair Mask: केस गळतीपासून आराम देईल अंड्याचा हा हेअर मास्क, ही आहे बनवण्याची योग्य पद्धत आणि फायदे

Published Mar 11, 2024 08:17 PM IST

Benefits of Egg Hair Mask: अनेक वेळा लोकांना केसांवर अंडी लावण्याची योग्य पद्धत माहित नसल्यास त्याचा पुरेपूर फायदा घेता येत नाही. यामुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते. जाणून घ्या अंड्याचा हेअर मास्क लावण्याची योग्य पद्धत

केसांवर अंडी लावण्याची योग्य पद्धत
केसांवर अंडी लावण्याची योग्य पद्धत (freepik)

Right Way To Apply Egg Mask on Hair: तुमचे लांब, दाट, सुंदर केस तुमचे सौंदर्य वाढवण्यात मोठी भूमिका बजावतात. पण आजकाल प्रदूषण, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केस कोरडे, निर्जीव आणि तुटत असल्याची तक्रार बहुतांश लोक करतात. जर तुम्हालाही तुमच्या केसांबद्दल अशाच समस्या असतील तर तुम्ही केसांची हरवलेली चमक परत आणण्यासाठी अंड्याची मदत घेऊ शकता. अंडी केवळ तुमच्या केसांची हरवलेली चमक परत आणत नाही तर तुमच्या केसांची चांगली वाढ करण्यास देखील मदत करते. बऱ्याच वेळा लोकांना केसांना अंडी लावण्याची योग्य पद्धत माहित नसल्यास याचा पुरेपूर फायदा घेता येत नाही, ज्यामुळे केस गळण्याच्या समस्येसह केस कोरडे आणि निर्जीव होतात. चला तर जाणून घेऊया केसांवर अंडी लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

अंड्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- २ अंड्याचा पांढरा भाग

- २ चमचे खोबरेल तेल

- २ चमचे दही

अंड्याचे हेअर मास्क बनवण्याची पद्धत

अंड्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात २ अंडी फोडून त्याचा पांढरा भाग वेगळा काढून घ्या. आता अंड्याचा पांढरा भाग चमच्याने फेटून त्यात २ चमचे खोबरेल तेल आणि २ चमचे दही टाका. तुमचा अंड्याचा हेअर मास्क तयार आहे. आता हा अंड्याचा हेअर मास्क ब्रशच्या साहाय्याने केसांवर लावा आणि २० मिनिटांनंतर केस माइल्ड शॅम्पूने धुवा. हा हेअर मास्क आठवड्यातून दोनदा लावा.

केसांना अंडी लावण्याचे फायदे

- केसांना अंडी लावल्याने स्प्लिट एंड्सची समस्या दूर होते.

- केसांवर अंडी लावल्याने कोरड्या आणि निर्जीव केसांची समस्या दूर होते.

- केस वाढण्यास मदत होते.

- कोरड्या स्काल्पची समस्या असलेल्या लोकांसाठी अंड्याचा मास्क खूप फायदेशीर आहे.

- प्रथिनेयुक्त अंडी तुमच्या टाळूचे पोषण करतात. त्यामुळे केसगळती कमी होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner