मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakfast Skipping: नाश्ता स्किप करणे ठरू शकते घातक, कारणं ऐकून हैराण व्हाल!

Breakfast Skipping: नाश्ता स्किप करणे ठरू शकते घातक, कारणं ऐकून हैराण व्हाल!

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 29, 2024 12:26 PM IST

Skipping Breakfast: अनेक लोक सकाळी नाश्ता करायला टाळाटाळ करतात. पण हे महत्त्वाचे मील स्किप केल्याने आरोग्यावार घातक परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या याची कारणे.

सकाळी नाश्ता स्किप केल्याने आरोग्यावर होणारे परिणाम
सकाळी नाश्ता स्किप केल्याने आरोग्यावर होणारे परिणाम (unsplash)

Reasons of Why Skipping Breakfast is Harmful: कामाची गडबड, धावपळमध्ये अनेल लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण तुम्हाला माहीत आहे का, सकाळचा नाश्ता स्किप केल्याने आपल्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ दान बुएटनर सांगतात, की, नाश्ता हा दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा आहार असतो. हा आपल्या शरीरात दिवसभर धावण्याचं बळ भरतो आणि दिवसाची सुरुवात आरोग्यदायी आहाराने करण्याची संधी देतो. सकाळी नाश्ता केल्याने फक्त एनर्जीच वाढत नाही तर संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. नाश्ता स्किप केल्याने आरोग्याला कसं धोका होऊ शकतो ते जाणून घ्या.

दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचे

दान बुएटनर यांनी जगात सर्वात जास्त आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या समाजाला 'ब्लू झोन्स' म्हटले आहे. ते सांगतात की ब्लू झोन्समध्ये नाश्ता हा प्राधान्यक्रम असतो. म्हणूनच दीर्घायुष्यासाठी नाश्ता महत्त्वाचा आहे. एक म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल की सकाळचा नाश्ता हा राजासारखा, दुपारचे जेवण राजकुमारप्रमाणे आणि रात्रीचे जेवण हे भिकाऱ्यासारखे करावे. ब्लू झोन्समध्ये नाश्ता हा दिवसाचा सगळ्यात मोठा आहार असतो आणि दिवस जसं जसं पुढे जातो तसं जेवण कमी आणि हलके होते. सकाळचा नाश्ता हा पौष्टिक आणि भरपूर करावा. दिवसाची सुरुवात करताना आहारात बीन्स, भाज्या, भात, फळे, मिसो, ओट्स यांचा समावेश करावा. नाश्ता केल्याने दिवसभरात ऊर्जा वाढते. नाश्ता न केल्याने दिवसभरात थकवा, आळशीपणा आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो.

मूड आणि झोप बिघडू शकते

तुम्ही नाश्ता टाळत असाल आणि मूड चांगला नसेल किंवा झोप नीट येत नसेल तर दोन्हीचा संबंध असू शकतो. २०२३ च्या अभ्यासात ७०० विद्यार्थ्यांवर चाचणी केली. त्यात नाश्ता न करणं हे झोप चक्रावर परिणाम करून नैराश्य वाढले आणि झोप बिघडली, असं आढळून आलं. नाश्ता स्किप केल्याने झोपेची समस्या होऊ शकते. ज्यामुळे थकवा, चिडचिडेपणा आणि दिवसभरात लक्ष केंद्रित करण्यास त्रास होऊ शकतो. दुसऱ्या छोट्या अभ्यासात २५ ते ३० वयाच्या व्यक्तींवर चाचणी केली गेली. त्यात नाश्ता करणाऱ्यांच्या तुलनेत नाश्ता न करणाऱ्यांमध्ये मूड कमी चांगला असल्याचं आढळून आलं. नाश्ता न केल्याने दिवसभरात आळशीपणा, चिडचिडेपणा आणि थकवा जाणवू शकतो. नाश्ता स्किप केल्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव वाढू शकतो.

 

याशिवाय नाश्ता स्किप केल्याने वजन वाढू शकते. नाश्ता न केल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच हृदयरोग होण्याचा धोका देखील वाढू शकतो. सकाळी नाश्ता करणे हे दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक चांगली पद्धत आहे. नाश्ता केल्याने दिवसभरात ऊर्जा वाढते, मूड चांगला राहतो आणि झोप चांगली येते. त्यामुळे, सकाळी नाश्ता करणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel