Health Care: आजकाल अनेक समस्यांनी आपण ग्रस्त झालो आहोत. बदलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाइफस्टाइलमुळे अनेक समस्या होत आहेत. सतत लॅपटॉपवर काम करणे, जास्त वेळ एकाच जागी बसून राहणे यामुळे अंग दुखी होत आहे. शरीरात वेदना सामान्यतः तेव्हाच जाणवते जेव्हा एखादी व्यक्ती काही आजाराने ग्रस्त असते. याशिवाय यामुळे थकवाही जाणवतो. मात्र, विश्रांती आणि पुरेशी झोप घेतल्यावरही ही समस्या दिसून येत असेल तर लक्ष देणे गरजेचे आहे. शरीरातील वेदनांमुळे शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. कधीकधी जळजळ देखील जाणवते. यामुळे आपण शरीरातील वेदना का होतात यामागचं कारणं शोधून काढणे गरजेचे आहे.
> झोपेच्या कमतरतेमुळे, शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते, ज्यामुळे वेदना देखील होऊ शकतात. दररोज ८ तासांची झोप घेणे खूप आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने, शरीरात उर्जा निर्माण करते. यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते.
> पाण्याच्या कमतरतेमुळेही शरीर दुखू शकते. पुरेसे पाणी न पिल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागते, त्यामुळे थकवा जाणवतो. यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि शरीरात वेदना होतात.
> तणावाचा शरीरावर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे शरीरात अशक्तपणा येतो आणि लवकर वृद्धत्वाची शक्यता वाढते. कमी प्रतिकारशक्तीमुळे शरीरात वेदना होतात.
> लोहाच्या कमतरतेमुळे, शरीराच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे व्यक्तीला अशक्तपणा आणि वेदना जाणवू शकतात.
> शरीरात व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात न मिळाल्यानेही शरीर दुखू शकते.
> शरीरात सूज किंवा सांधेदुखीमुळे अनेक प्रकारच्या वेदना होतात.
> सतत वेदना जाणवत असल्यास क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम असू शकते.
> सर्दी, खोकला किंवा फ्लूमुळे संपूर्ण शरीरात वेदना होण्याची शक्यता असते. व्हायरल इन्फेक्शनमुळे शरीर दुखणे ही एक सामान्य समस्या आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या