मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Tips: प्रेग्नेंसीमध्ये हात-पाय का सुजतात? या घरगुती उपायांनी मिळेल आराम

Pregnancy Tips: प्रेग्नेंसीमध्ये हात-पाय का सुजतात? या घरगुती उपायांनी मिळेल आराम

May 24, 2024 12:19 AM IST

Swollen Feet During Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये महिलांच्या पायावर सूज कशामुळे येते आणि काही घरगुती उपाय करून ती बरी होऊ शकते का? जाणून घ्या.

प्रेग्नेंसीमध्ये पाय सूजण्याचे कारण आणि घरगुती उपाय
प्रेग्नेंसीमध्ये पाय सूजण्याचे कारण आणि घरगुती उपाय (Freepik)

Home Remedies for Swollen Feet During Pregnancy: गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. याच काळात बहुतेक महिलांना उलट्या, डोकेदुखी, चक्कर येणे, लठ्ठपणा, चेहऱ्यावर पुरळ येणे आणि हात-पायांवर सूज येणे असा अनुभव येतो. गर्भधारणेदरम्यान पायांना सूज येणे ही एक सामान्य समस्या आहे. ज्याला वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणतात. जर ही सूज हात आणि चेहऱ्यावर दिसली तर ते प्रीक्लेम्पसियाचे लक्षण असू शकते. प्रेग्नेंसीमध्ये उच्च रक्तदाबाची स्थिती म्हणतात. आता प्रश्न असा पडतो की गरोदरपणात महिलांच्या पायावर ही सूज कशामुळे येते आणि काही घरगुती उपाय करून ती बरी होऊ शकते का? जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

एडेमा म्हणजे काय?

तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात पायांना सूज येणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. ही स्थिती बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शरीरात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त रक्त आणि द्रवामुळे होते. ज्याला वैद्यकीय भाषेत एडेमा म्हणतात. त्यामुळे केवळ पायांनाच नव्हे तर हात, चेहरा आणि शरीराच्या इतर भागांनाही सूज येऊ शकते.

प्रेग्नेंसीमध्ये पाय का सुजतात?

हार्मोन्समधील बदल

गरोदरपणात महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, एचसीजी आणि प्रोलॅक्टिनसारख्या अनेक हार्मोन्सची पातळी लक्षणीय वाढते. त्यामुळे सूज होऊ लागते.

वाढते वजन

गरोदरपणात महिलांचे वजन खूप वाढते. वजन वाढल्यामुळे पायाला सूज येऊ लागते.

हिमोग्लोबिनची कमतरता

गरोदरपणात महिलांच्या शरीरात प्रोटीन आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पाय सूजण्याची समस्या सुरू होते. तथापि प्रसूतीनंतर पाय सामान्य स्थितीत परत येतात.

पायांची सूज दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

उशीवर पाय ठेवा

गरोदरपणात एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्याने किंवा उभे राहिल्याने पायांना सूज येऊ शकते. अशा स्थितीत पायांना विश्रांती देण्यासाठी पलंगावर एक उशी ठेवा आणि त्यावर पाय ठेवून सुमारे २० मिनिटे झोपा. असे दिवसातून दोन-तीन वेळा केल्याने पायांच्या सूज आणि दुखण्यापासून आराम मिळेल.

एप्सम सॉल्टच्या पाण्याने शेक घ्या

जर तुम्हाला तुमच्या पायांना सूज येत असेल तर तुम्ही पाण्यात एप्सम मीठ घालून ते शेक घेऊ शकता. एप्सम सॉल्टचे गुणधर्म पायांच्या स्नायूंना दाबून वेदना कमी करण्यास मदत करतात. हा उपाय करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात एक चमचा एप्सम मीठ घाला. आता या पाण्यात २० ते २५ मिनिटे पाय भिजवा.

पोटॅशियम युक्त आहार

गरोदरपणात शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे सुद्धा पायांना सूज येऊ शकते. त्यामुळे महिलेला उच्च रक्तदाब आणि पाणी टिकून राहण्याची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत ही समस्या टाळण्यासाठी पोटॅशियमयुक्त पदार्थ जसे की बटाटा, केळी, डाळिंब, पिस्ता, रताळे यांचा आहारात समावेश करा.

मिठाचे सेवन कमी करा

गरोदरपणात पायांची सूज कमी करण्यासाठी मिठाचे सेवन कमी करा. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी टिकून राहण्याची समस्या आणखी वाढू शकते.

एकाच स्थितीत जास्त वेळ बसू नका किंवा उभे राहू नका

गरोदरपणात दीर्घकाळ एकाच स्थितीत उभे राहणे किंवा बसणे यामुळेही पायांना सूज येऊ शकते. अशा परिस्थितीत जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नका, स्थिती बदला, पाय सक्रिय ठेवा. तुम्ही बराच वेळ उभे असाल किंवा चालत असाल तर थोडा ब्रेक घ्या. असे केल्याने सूज कमी होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel