PM Modi Fitness: साडेतीन तासांची झोप आणि खास डाएट, जाणून घ्या पीएम मोदींचे फिटनेस सीक्रेट
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  PM Modi Fitness: साडेतीन तासांची झोप आणि खास डाएट, जाणून घ्या पीएम मोदींचे फिटनेस सीक्रेट

PM Modi Fitness: साडेतीन तासांची झोप आणि खास डाएट, जाणून घ्या पीएम मोदींचे फिटनेस सीक्रेट

Published Sep 17, 2024 09:34 PM IST

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही पंतप्रधानांची तंदुरुस्ती आणि ऊर्जा पाहून त्यांची जीवनशैली आणि दैनंदिन सवयी जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला पंतप्रधानांच्या या हेल्दी लाइफस्टाइल आणि फिटनेस सीक्रेटबद्दल सांगणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PTI)

Lifestyle and Fitness Secret of PM Narendra Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. तुमची राजकीय विचारधारा काहीही असो, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी आहे, हे मान्य करावे लागेल. वयाच्या ७४ व्या वर्षीही त्यांच्यात जी ऊर्जा आणि उत्साह आहे, ती तरुणाईसाठी एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. आपल्या बिझी शेड्यूलमुळे या वयातही इतकी एनर्जी आणि चेहऱ्यावरील चमक पाहून पंतप्रधानांची जीवनशैली कशी आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. चला तर मग जाणून घेऊया आज देशाच्या पंतप्रधानांच्या खास लाईफस्टाईल आणि फिटनेस सीक्रेटबद्दल.

योग आहे रूटीनचा महत्त्वाचा भाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योगावर प्रचंड विश्वास आहे. आपल्या अनेक भाषणांमधून आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ते योगाचे फायदे सांगत असतात. त्याचबरोबर लोकांनी याला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा असा ते आग्रह धरतात. योगाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखतात. पंतप्रधान मोदींच्या सकाळची सुरुवात मॉर्निंग वॉकने होते आणि त्यानंतर ते मेडिटेशनही करतात. यानंतर योगासन, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार हा त्यांच्या दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. नियमित चालणे आणि योगा केल्याने त्यांचे शरीर दिवसभर ताजेतवाने, ऊर्जावान आणि उत्साहाने भरलेले राहते.

आहाराची घेतात विशेष काळजी

सहसा प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न असतो की, या वयातही पंतप्रधान मोदींमध्ये एवढी ऊर्जा कुठून येते की केवळ साडे तीन तास झोपूनही ते सतत कामात गुंतलेले असतात. या ऊर्जेचे काही श्रेय त्यांच्या आहारालाही जाते. खरं तर नरेंद्र मोदी आपल्या डाएटचे काटेकोरपणे पालन करतात. जास्त तेल आणि मसाल्यांचे सेवन करणे टाळतात. त्यांना जेवणात गुजराती पदार्थ आणि खिचडी आवडते. याशिवाय रोजच्या आहारात ते दह्याचा नक्कीच समावेश करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराठ्यांसोबत हिमाचल प्रदेशची मशरूम करी खूप आवडते. याशिवाय संध्याकाळी ६ नंतर ते काहीही खात नाहीत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner