Dwarkadhish Temple: द्वारकाधीशशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या मंदिराशी संबंधित फॅक्ट्स-know the interesting facts related to dwarkadhish temple ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dwarkadhish Temple: द्वारकाधीशशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या मंदिराशी संबंधित फॅक्ट्स

Dwarkadhish Temple: द्वारकाधीशशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या मंदिराशी संबंधित फॅक्ट्स

Feb 25, 2024 11:45 PM IST

Travel Tips: गुजरातमधील पवित्र मंदिर द्वारकाधीश मंदिराशी संबंधित अनेक रंजक तथ्ये आहेत, ज्या कदाचित तुम्हाला माहितही नसतील. जाणून घ्या काही रंजक गोष्टी.

द्वारकाधीश मंदिर
द्वारकाधीश मंदिर

Interesting Facts About Dwarkadhish Temple: पश्चिम टोकावर स्थित द्वारका हे भारतातील एक प्राचीन शहर आहे. येथील गोमती नदीच्या काठावर वसलेले द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमधील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक या मंदिरात दर्शनासाठी आणि जवळपासचा परिसर फिरण्यासाठी येतात. या मंदिराशी संबंधित काही रंजक आणि पौराणिक गोष्टींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया मंदिराशी संबंधित काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स.

अनेक वर्षे जुनी आहे मंदिराची वास्तू

द्वारका शहराचा इतिहास महाभारतातील द्वारका राज्याच्या काळापासूनचा आहे. द्वारकाधीश मंदिर पाच मजली असून हे चुनखडी आणि वाळूने बांधलेले आहे. असे म्हटले जाते की २२०० वर्षे जुनी वास्तुकला त्यांचा नातू वज्रनाभ याने बांधली होती, ज्याने ते भगवान कृष्णाने समुद्रातून मिळवलेल्या जमिनीवर बांधले होते. मंदिराच्या आत इतर अनेक मंदिर आहेत, जे सुभद्रा, बलराम आणि रेवती, वासुदेव, रुक्मिणी आणि इतरांना समर्पित आहेत. या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना गोमती नदीत स्नान करावे लागते.

अनेक वेळा बदलला जातो मंदिराचा ध्वज

इतर मंदिरांप्रमाणे या मंदिराच्या शिखरावरही एक ध्वज फडकतो, ज्याला भाविक सूर्य आणि चंद्राचे प्रतीक मानतात. या ध्वजाची उंची सुमारे ७५ फूट असल्याचे सांगितले जाते. अहवालानुसार हा ध्वज दिवसातून किमान पाच वेळा बदलला जातो. परंतु चिन्ह तसेच राहते.

दोन्ही दरवाजांना वेगवेगळी नावे

मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा असला तरी या मंदिराला दोन दरवाजे आहेत. उत्तरेकडे एक दरवाजा आहे, जो 'मोक्षद्वार' म्हणून ओळखला जातो. दुसरा दरवाजा दक्षिणेकडे असून त्याला 'स्वर्गद्वार' असेही म्हणतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग