Bridal Smile Makeover Tips: ब्रायडल स्माइल मेकओव्हर ही केवळ एक डेंटल ट्रीटमेंट नाही. तर वधूचे नैसर्गिक हास्य अधिक खुलविण्यासाठी करण्यात येणारी एक जर्नी आहे. प्रत्येक वधूच्या गरजेनुसार हे तयार केले जाते. लग्नाच्या दिवशी नवरीचे लूकच अप्रतिम असावे असे नाही. तर तिची स्माईल सुद्धा तितकीच प्रफुल्लित याची काळजी या ट्रीटमेंटमुळे घेतली जाते. सर्वांगीण दृष्टिकोनामुळे विविध उपचारांचा यात समावेश करण्यात येतो. दात पांढरे करणे व दातातील भेगा बुजविण्यापासून (डेंटल बॉण्डिंग) ते पोर्सेलिन व्हिनिअर्स, डेंटल इम्प्लांट्स आणि ऑर्थोडॉन्टिक उपाचारांपर्यंत विविध पर्यायांचा त्यात समावेश होतो.
मुंबई येथील डॅझल डेंटल क्लिनिकचे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. राजेश शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली. ब्रायडल स्माइल मेकओव्हर हे केवळ ब्युटी ट्रीटमेंट नाही तर स्वाभिमान व आत्मविश्वासासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. हे उपचार केल्याने फक्त लग्नाच्याच दिवशी नव्हे तर त्यानंतरच्या अनेक सुंदर प्रसंगी वधूचे व्यक्तिमत्व खुलून दिसते. सुयोग्य स्माइल मेकओव्हर हा आयुष्य बदलून टाकतो आणि तुमच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडते. कला व दंतविज्ञानाची सांगड या उपचारांमध्ये घालण्यात आली आहे.
हा एक अत्यंत लोकप्रिय उपचार आहे. कारण तो लगेच होतो. हा वेदनारहीत आहे आणि त्याचा खूप प्रभाव पडतो. तुम्ही हे क्लिनिकमध्ये किंवा घरी करू शकता. त्यामुळे दातावरील डाग निघून जातात आणि नैसर्गिक, चमकदार हास्य पुन्हा प्राप्त होते.
दातांमधील किरकोळ दोष दूर करण्याचा बजेटमधील उपाय म्हणजे डेंटल बॉण्डिंग. यामध्ये दाताच्या रंगाचे रेझिन वापरतात. ही ट्रीटमेंट केल्याने तुमचे दात अधिक सुंदर दिसतात. दाताच मूळ रंग जाणे किंवा दातांमध्ये मोकळी जागा असणे यासारख्या समस्यांचे या उपचारामुळे निराकरण होते.
दातांचे अधिक परिवर्तन करायचे असेल तर व्हिनिअर हा टिकाऊ उपचार आहे. यामुळे दातांच्या रचनेमधील अनेक दोष दूर होऊन एकसमान संरचना असलेले, चमकदार स्माइल प्राप्त होते.
निखळ व परफेक्ट हास्य प्राप्त करण्यासाठी पारंपरिक तारा किंवा इन्व्हिसालिनसारखे अधिक प्रगत ऑर्थोडॉन्टिक उपचार उपलब्ध आहेत. या उपचारांसाठी लागणाऱ्या कालावधीमध्ये फरक असतो. पण या उपचारांमुळे दिसणारा परिणाम म्हणजे मोहक, सुबक हास्य असते.
ज्यांचा एखादा दात नसेल त्यांच्यासाठी डेंटल इम्प्लांट म्हणजेच दंतप्रत्यारोपण हा टिकाऊ, नैसर्गिक दिसणारा उपचार आहे. त्यामुळे दातांच्या सौंदर्यात भर पडते आणि हास्यही सुंदर दिसते.
स्माइल मेकओव्हर प्रवासाची सुरुवात करण्याआधी काटेकोर नियोजनाची आवश्यकता असते. तुमच्या लग्नाच्या बऱ्यापैकी काही दिवसांआधी कॉस्मेटिक डेंटिस्टशी संपर्क साधावा. जेणेकरून तुमच्या आवश्यकतेनुसार पर्यायांचा विचार आणि उपचारांचे नियोजन करता येईल. काही उपचारांसाठी एकाहून अधिक अपॉइंटमेंट्स, अनेक आठवड्यांची तयारी करावी लागते. त्यामुळे आयुष्यातील या महत्त्वाच्या दिवशी पूर्णपणे तयार असण्यासाठी वेळ फार महत्त्वाची असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या