Health Benefits of Poppy Seeds: खसखस, ज्याला पॉपी सीड्स देखील म्हणतात, याचा वापर प्रामुख्याने ग्रेव्ही बनवण्यासाठी केला जातो. पण हे खसखस चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठी ओळखले जातात. या लहान पांढऱ्या बियांमध्ये भरपूर पोषण असते. म्हणूनच गरोदरपणानंतर स्त्रियांना खसखस बारीक करून दिली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की रोज खसखस खाल्ल्यास हृदय निरोगी राहते तसेच इरिटेबल बाउल सिंड्रोमपासून ही मुक्ती मिळते. जाणून घ्या खसखस खाण्याचे आरोग्य फायदे
खसखसमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण ०.७ ग्रॅम असते. तर ओमेगा ३ फॅटी अॅसिड ११५ मिलीग्राम तर ओमेगा ६ फॅटी अॅसिड सुमारे १३५८ मिलीग्राम असते. तसेच, प्रथिने सुमारे १.६ ग्रॅम आणि आहारातील फायबर १.६ ग्रॅम असते. मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह तसेच कॅल्शियम सुमारे १२६ मिलीग्राम असते.
आहारात रोज खसखस खाल्ल्यास आतड्याचे आरोग्य सुधारते. तसेच बाउल मूव्हमेंट सोपी होते. ज्यामुळे इरिटेबल बाउल सिंड्रोमची समस्या दूर होते. त्याचबरोबर ज्यांना अन्न खाल्ल्यानंतरच किंवा हेवी काहीतरी प्यायल्यानंतरच पोटात दुखतं, त्यांनी खसखस खावी.
खसखसमध्ये हृदय निरोगी ठेवणारी सर्व आवश्यक खनिजे असतात. जर तुम्ही ते रोज खात असाल तर ते हृदयाचे आरोग्यही निरोगी ठेवतात.
अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने खसखस खाल्ल्याने त्वचा तरुण दिसते आणि केसांची वाढ होते. खसखस अकाली वृद्धत्व रोखण्याबरोबरच त्वचेला चमकदार बनविण्याचे काम करते.
ज्या लोकांच्या हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते, त्यांच्यासाठी खसखस फायदेशीर ठरते. यात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळे शरीरातील ही कमतरता दूर होते.
ज्या स्त्रियांना प्रजनन समस्या आहे त्यांना झिंक, कॅल्शियम आणि लोहाची जास्त आवश्यकता असते. अशा वेळी खसखस बीज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वाढविण्यास मदत करते आणि महिलांना गर्भधारणा करणे सोपे जाते.
- रोजच्या आहारात खसखसचा समावेश करण्यासाठी तुम्ही चटणी बनवून खाऊ शकता
- तुम्ही एक चमचा खसखस ताकात मिसळून पिऊ शकता.
- खसखस खडी साखरसोबत मिक्स करून सुद्धा खाऊ शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या