Health Benefits of Garlic Peel: लसणाचा वापर अनेकदा जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की लसणाप्रमाणेच लसणाची सालही आरोग्यासाठी आणि चवीसाठी खूप फायदेशीर असतात. होय, लसूण सोलल्यानंतर बहुतेक लोक त्याची साल निरुपयोगी समजतात आणि कचऱ्यात टाकतात. कदाचित तुम्हीही आत्तापर्यंत असेच करत असाल. पण लसणाची साले जेवणाची चव तर वाढवतातच पण दम्यापासून ते सुजलेल्या पायांपासून आरामही मिळवून देतात हे जाणून घेतल्यावर पुढच्या वेळी लसणाचे साल फेकून देण्याची चूक तुम्ही क्वचितच कराल. चला जाणून घेऊया लसणाच्या सालीचे कोणते आश्चर्यकारक फायदे आहेत.
लसणाच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळेच आयुर्वेदात लसणाला औषध मानले जाते. लसणाच्या सालीची पावडर पिझ्झा आणि सँडविच सारख्या गोष्टींवर मसाला म्हणून वापरली जाऊ शकते.
ज्यांना खाज आणि एक्जिमासारख्या त्वचेशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी लसणाची साल खूप फायदेशीर ठरते. हा उपाय करण्यासाठी लसणाची साले काही तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर हे पाणी त्वचेच्या प्रभावित भागात लावा. हा उपाय केल्याने तुम्हाला खाज आणि जळजळीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. इतकेच नाही तर त्याचे अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्समध्ये देखील खूप फायदेशीर आहेत.
लसणाची साल दम्याच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते. अस्थमाच्या रुग्णांनी लसणाची साले बारीक करून मधासोबत सकाळी आणि संध्याकाळी सेवन करावे. हे मिश्रण तुम्ही दिवसातून दोनदा खाऊ शकता. यामुळे दम्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो.
लसणाची साले पाण्यात उकळून केसांना लावल्याने डोक्यातील उवा, कोंडा आणि टाळूला खाज येणे यासारख्या केसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
पायांच्या सुजेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लसणाच्या सालीचा वापर करू शकता. हा उपाय करण्यासाठी कोमट पाण्यात लसणाची साले टाका आणि त्या पाण्यात काही वेळ पाय बुडवून ठेवा. पायांची सूज आणि वेदना हळूहळू कमी होईल.
लसणाच्या सालीमध्ये अँटी व्हायरल, अँटीफंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. आपण ते भाज्या, मसाले आणि हर्ब्सनी समृद्ध सूपमध्ये वापरू शकता. यामुळे सूपचे पौष्टिक मूल्य वाढेल आणि त्याची चवही वाढेल. याशिवाय लसणाच्या सालींमुळे पुलाव किंवा फ्राईड राईसची वाढते. यासाठी लसणाची साले पाण्यात उकळून त्याचा वापर करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या