मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  शारीरिक- मानसिक आरोग्य सुधारू शकते फूट मसाज, पाहा रोज मालिश करण्याचे फायदे

शारीरिक- मानसिक आरोग्य सुधारू शकते फूट मसाज, पाहा रोज मालिश करण्याचे फायदे

Jan 31, 2023 07:25 PM IST

Foot Massage: पायांना मसाज केल्याने तुम्हाला आराम तर मिळतोच, पण असे केल्याने तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदे मिळू शकतात. येथे पाहा फुट मसाजचे जबरदस्त फायदे

फुट मसाजचे फायदे
फुट मसाजचे फायदे (unsplash)

Health Benefits of Foot Massage: दिवसभर थकून घरी आल्यावर पाय दुखू लागतात. या वेदनांचा सामना करण्यासाठी काही लोक कोमट पाण्यात पाय भिजवतात आणि काही लोक हीटिंग पॅड वापरतात. यामुळे तुम्हाला आराम नक्कीच मिळते पण झोप येत नाही. हे थकवा आणि तणावामुळे होते. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी पायाची मसाज तुम्हाला मदत करू शकते. होय, फुट मसाज मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. येथे जाणून घ्या त्याचे काही फायदे.

ट्रेंडिंग न्यूज

फुट मसाजचे फायदे

सांधेदुखीत आराम

फुट मसाज करून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. असे रोज केल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. जेव्हा तुम्ही फुट मसाज करता तेव्हा रक्ताभिसरण चांगले होते. ज्यामुळे मज्जातंतूंना आराम मिळतो.

मन शांत होईल

अनेक वेळा तणाव आणि थकव्यामुळे झोप येत नाही. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांची मालिश केल्यास मन शांत होण्यास मदत होते.

लठ्ठपणा कमी होतो

तुम्हाला हे विचित्र वाटेल की रोज पायाची मसाज केल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. होय, पायाची मालिश चयापचय सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मसाजमुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेली चरबी काढून टाकण्यास मदत होते. घामाच्या मदतीने विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होते.

उष्णता टिकून राहते

मसाज दरम्यान तळव्याच्या वेगवेगळ्या बिंदूंवर दबाव तयार केला जातो, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो. असे झाल्यावर शरीराच्या वेगवेगळ्या भागांना आराम मिळतो आणि ते शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग