Health Benefits: शरीरासाठी वरदान आहे बडीशेप आणि खडी साखरेचे मिश्रण, मिळतात असंख्य फायदे-know the health benefits of eating fennel seeds and sugar candy daily ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Benefits: शरीरासाठी वरदान आहे बडीशेप आणि खडी साखरेचे मिश्रण, मिळतात असंख्य फायदे

Health Benefits: शरीरासाठी वरदान आहे बडीशेप आणि खडी साखरेचे मिश्रण, मिळतात असंख्य फायदे

Sep 09, 2024 11:35 AM IST

Healthy Eating Tips: बडीशेप आणि खडी साखरची जोडी केवळ चांगले माउथ फ्रेशनर म्हणून काम करत नाही तर त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे देखील आहेत.

Health Benefits: बडीशेप आणि खडी साखर खाण्याचे फायदे
Health Benefits: बडीशेप आणि खडी साखर खाण्याचे फायदे

Health Benefits of Eating Fennel Seeds and Sugar Candy: जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये लंच किंवा डिनरसाठी जाता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की जेवल्यानंतर तिथे बडीशेप आणि खडी साखर दिली जाते. याशिवाय अनेकांना घरी जेवल्यानंतर बडीशेप आणि खडी साखर खाणे आवडते. पण तुम्हाला माहित आहे का की हे कॉम्बिनेशन फक्त माउथ फ्रेशनरसारखे काम करत नाही, तर त्याचे आरोग्यासाठी ही बरेच फायदे आहेत. दररोज जेवल्यानंतर एक चमचा बडीशेप आणि खडी साखर खाणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे वरदान ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला बडीशेप आणि खडी साखर खाण्याचे आरोग्यदायी फायदे सांगत आहोत.

जेवण पचवण्यासाठी आहे फायदेशीर

बडीशेप आणि खडी साखर पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतात. जर एखाद्या व्यक्तीला अन्न पचवण्यास त्रास होत असेल किंवा बद्धकोष्ठता किंवा अॅसिडिटीची समस्या असेल तर बडीशेप आणि खडी साखरेचे सेवन त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जेवल्यानंतर एक चमचा बडीशेप आणि एक चमचा खडी साखर खाल्ल्याने अन्न सहज पचते आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

तोंडाची दुर्गंधी दूर होते

अनेकदा लोकांच्या तोंडातून विचित्र वास येऊ लागतो. तोंडाच्या दुर्गंधीच्या समस्येने खूप त्रस्त असलेले अनेक जण आहेत, लाख उपाय करूनही त्यांच्या तोंडाचा वास येतो. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही बडीशेप आणि साखरेचे कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. जेवण केल्यानंतर बडीशेप आणि खडी साखर खाल्ल्याने तोंडाचा घाणेरडा वास बऱ्याच अंशी दूर होतो.

हिमोग्लोबिन वाढवण्यात मदत

बडीशेप आणि खडी साखरेचे सेवन केल्याने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता भासत नाही. यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास खडी साखर आणि बडीशेपचे नियमित सेवन केल्याने बऱ्याच अंशी आराम मिळतो. विशेषत: महिलांमध्ये लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता खूप जास्त प्रमाणात आढळते. अशावेळी हे कॉम्बिनेशन महिलांसाठी वरदान ठरू शकते.

अशक्तपणा ठेवतो दूर

ज्या लोकांच्या शरीरात अशक्तपणा असतो, ज्यामुळे ते नेहमी थकलेले असतात, त्यांच्यासाठी देखील बडीशेप आणि खडी साखर खूप फायदेशीर आहे. बडीशेप आणि खडी साखरमध्ये आढळणारे लोह आणि प्रथिने शरीरातील कमकुवतपणा दूर करतात आणि थकव्याची समस्या दूर करतात. जर तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल आणि शरीरात सतत थकवा जाणवत असेल तर बडीशेप आणि खडी साखरेचे सेवन केल्यास खूप फायदा होईल.

डोळ्यांसाठी आहे वरदान

बडीशेप आणि खडी साखरेचे सेवन डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. बडीशेप आणि खडी साखरेचे मिश्रण दुधात मिसळून रोज प्यायल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात आणि दृष्टी सुधारते. हल्ली मुलांना लहान वयातच चष्मा लागतो. अशावेळी मुलांच्या रोजच्या आहारात बडीशेप आणि खडी साखरेचे कॉम्बिनेशन खायला दिले तर त्यांचे डोळे निरोगी राहतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner