Moringa Water Benefits: जादूपेक्षा कमी नाही शेवग्याचे पाणी, एकाच वेळी अनेक आजारांपासून देते आराम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Moringa Water Benefits: जादूपेक्षा कमी नाही शेवग्याचे पाणी, एकाच वेळी अनेक आजारांपासून देते आराम

Moringa Water Benefits: जादूपेक्षा कमी नाही शेवग्याचे पाणी, एकाच वेळी अनेक आजारांपासून देते आराम

Published Jul 13, 2024 12:43 PM IST

Moringa Water Benefits in Marathi: रोज सकाळी रिकाम्या पोटी हे मॅजिक ड्रिंक प्यायल्यास अनेक आजारांपासून आराम मिळतो. तसेच सौंदर्य वाढवण्यास मदत होईल.

शेवग्याचे पाणी पिण्याचे फायदे
शेवग्याचे पाणी पिण्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Moringa Water: दररोज सकाळी सर्वप्रथम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जर हे पाणी औषधी तत्वांनी समृद्ध असेल तर शरीराला अधिक फायदे मिळतात. मोरिंगा ज्याला ड्रमस्टिक, शेवगा असेही म्हणतात. शेवग्याच्या पानांचे पाणी रोज प्यायल्यास अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. या पाण्याला मॅजिक वॉटर म्हणतात कारण त्याचे पौष्टिक मूल्य खूप जास्त असते आणि दररोज ते पिणे फायदेशीर ठरू शकते.

शेवगा आहे वरदान

मोरिंगा म्हणजे शेवग्याची पाने, खोड, फुले आणि शेंगा हे सर्व पोषक तत्वांनी भरलेले असतात. हे रोज खाल्ल्याने अनेक प्रकारच्या पोषणाची कमतरता पूर्ण होते. शेवग्याच्या पानांचे पाणी रिकाम्या पोटी प्यायले तर शरीराला हे सर्व फायदे मिळतात.

कसे प्यावे शेवगा पावडरचे पाणी

शेवग्याचे पाणी पिण्यासाठी शेवग्याची पाने म्हणजेच वाळवून त्याची पावडर तयार करावी. एक चमचा ही पावडर घेऊन एक लिटर पाण्यात पाच मिनिटे उकळून घ्या. मग हे पाणी प्या. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शेवग्याची ताजी पाने पाण्यात उकळू शकता. रोज सकाळी हे पाणी प्यावे.

शेवग्याचे पाणी पिण्याचे फायदे

वेदनांपासून आराम

सांधेदुखी, संधिवात, हाडांच्या दुखण्यापासून मुक्त होण्यास शेवगा मदत करते. शेवग्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे जळजळ कमी होते आणि वेदना कमी होतात. या पानांमध्ये वेदना कमी करणारे पॉलीफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स हे घटक असतात. त्यामुळे रोज शेवग्याचे पाणी प्यायल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो.

मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास आणि वेट लॉसमध्ये मदत

शेवग्याचे पाणी दररोज प्यायल्याने चयापचय शक्ती वाढते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कमी कॅलरी आणि पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे शरीराला आवश्यक पोषणही मिळते आणि परिपूर्णतेची अनुभूती मिळते. रोज शेवग्याचे पाणी प्यायल्याने क्रेविंग कमी होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते.

मधुमेही रुग्णांसाठी वरदान

टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांना इंसुलिन सेसेंटिव्हिटी योग्य करण्यास आणि ब्लड शुगर रेग्युलेट करण्यासाठी हे पाणी प्यावे. प्री-डायबेटिक लक्षणांमध्ये शेवग्याचे पाण्याचा प्रभाव वेगाने दिसून येतो आणि रक्तातील साखरेची पातळी राखली जाते.

शरीर करते डिटॉक्स

मोरिंगामध्ये नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन गुणधर्म असतात. ज्यामुळे यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ होण्यास, डिटॉक्स होण्यास मदत होते. हे शरीराला ऊर्जा देखील देते आणि कॅफिनमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते.

हिमोग्लोबिन वाढवते

ज्या लोकांना हिमोग्लोबिनची समस्या आहे त्यांनी शेवग्याचे पाणी प्यावे. यात व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह असते. ज्यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

शेवग्याचे पाणी प्यायल्याने सौंदर्यही वाढते. यामुळे त्वचा आणि केसांना नवी चमक आणि जीवन मिळते. व्हिटॅमिन ईच्या समृद्ध स्त्रोतामुळे केस मजबूत होतात आणि त्वचा मुलायम होते. मुरुम, रुक्ष त्वचेपासून सुटका मिळवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner