Health Benefits of Drinking Methi Water: अनेक पदार्थमध्ये तडका लावणे असो किंवा पराठे, चटणी, लाडू बनवण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर केला जातो. मेथीमुळे जेवणाची चव आणि सुगंध तर चांगले होतेच शिवाय आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे सुद्धा मिळतात. मेथीमध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. एवढेच नाही तर रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मेथीचे पाणी बनवण्याची योग्य पद्धत आणि ते रिकाम्या पोटी प्यायल्याने कोणते फायदे मिळतात ते जाणून घ्या.
रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मेथीचे पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. हे पाणी गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमध्ये असलेल्या फायबरमुळे मल मऊ होतो. तर पाण्यात असलेलेपाचक एंझाइम अन्न सहज पचण्यास मदत करतात.
मेथीचे पाणी त्वचेला अनेक फायदे देते. मेथीचे पाणी स्किन एलर्जी कमी करून त्वचेचे पोषण करते. ज्यामुळे पिंपल्स, डाग यांसारख्या समस्या सहज दूर होतात आणि त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.
मेथीच्या दाण्यांमध्ये म्युसिलेज नावाचा घटक असतो. यामुळे सर्दी-खोकला मध्ये आराम मिळतो. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे उकळवून पाणी अर्धे राहिल्यावर गाळून प्यावे.
मेथीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जे वजन कमी करण्यास मदत करते.
मेथीचे पाणी प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. मेथी रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
मेथीचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम १ चमचा मेथीचे दाणे १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. यानंतर सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)