Health Benefits of Cloves Tea for Cold and Cough: हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि छातीत कफ जमा होणे अशा तक्रारी सुरू असतात. त्यातही आता काही दिवसांपासून पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. याचा देखील आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, सर्दी खोकला, कफच्या समस्येत वाढ झाली आहे. या समस्या टाळण्यासाठी लोक विविध घरगुती उपाय करून पाहतात. या बदललेल्या वातावरणात तुम्हालाही सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल, तर लवंगाचा चहा तुमच्या रुटीनचा भाग बनवा. लवंगाचा वापर केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठीही केला जातो. लवंगमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट, वेदना कमी करणारे घटक, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल असे अनेक औषधी गुणधर्म व्यक्तीला थंडीपासून संरक्षण करून अनेक आरोग्यदायी फायदे देतात. सर्दी, खोकला, कफपासून आराम देण्यासाठी लवंगाचा चहा कसा बनवायचा ते जाणून घ्या.
लवंगाचा चहा बनवण्यासाठी प्रथम लवंग गरम पाण्यात उकळा आणि पाणी गाळून घ्या. आता या लवंगाच्या पाण्यात मध मिसळून प्या. सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळेल.
चहा - लवंग, आले आणि तुळशीपासून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.
काढा - खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी लवंग, काळी मिरी, आले, तुळस, दालचिनी, ज्येष्ठमध यांसारखे मसाले पाण्यात टाकून उकळून गाळून घ्या. यानंतर यात मध मिसळून प्यायल्याने आराम मिळेल.
गरम पाणी - गरम पाण्यात ५-६ लवंगा उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. त्यानंतर हे पाणी दिवसभर प्यावे.
मध - हा उपाय करण्यासाठी ५-६ लवंगा भाजून मधासोबत सेवन करा. हा उपाय दिवसातून २-३ वेळा करा.
सैंधव मीठ - २-३ लवंगा सोबत दिवसातून दोनदा खाल्ल्याने घसादुखीपासून लवकर आराम मिळतो.
- लवंगमध्ये फ्लेव्होनॉइड्स, हायड्रॉक्सीबेंझोइक अॅसिड, ड्रॉक्सफेनिल प्रोपेन, युजेनॉल, गॅलिक आणि कॅफेक, फेरुलिक अॅसिड, केम्पफेरॉल, सॅलिसिलिक अॅसिड आणि
क्वेरीसेट यांसारखे गुणधर्म आणि सक्रिय संयुगे असतात. जे व्हायरल इन्फेक्शन, मौसमी एलर्जी, सर्दी, खोकला आणि कफ यांसारख्या समस्यांमध्ये आराम देते.
- लवंगामध्ये असलेले अँटी-एलर्जिक गुणधर्म बदलत्या ऋतूंमध्ये होणारी एलर्जी कमी करण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत हिवाळ्यात लवंगाचा चहा प्यायल्याने अनेक प्रकारच्या एलर्जीपासून बचाव होतो.
- लवंग चहामध्ये असलेले अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म फुफ्फुसावरील सूज कमी करून व्यक्तीला आराम देऊ शकतात.
- लवंगचा चहा प्यायल्याने जुनाट खोकला किंवा कोरडा खोकला ही समस्या कमी होण्यास मदत होते. निमोनिया आणि ब्राँकायटिसमुळे दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत लवंगातील अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म जुनाट खोकला कमी करण्यास मदत करतात.
- कफ आणि खोकल्यामध्ये लवंगाचा चहा फायदेशीर आहे. हा चहा कफ तोडण्यास आणि श्लेष्मा वितळण्यास आणि फुफ्फुसांना आराम देण्यास मदत करतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)