मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sesame Oil Benefits: आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करण्याचे आहेत अनेक फायदे, चुकवू नका

Sesame Oil Benefits: आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करण्याचे आहेत अनेक फायदे, चुकवू नका

Jun 15, 2024 11:21 AM IST

Healthy Diet: स्वयंपाकात तिळाचे तेल वापरण्यास सुरुवात केल्यास त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतील. कोणते ते जाणून घ्या

तिळाच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे
तिळाच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे (unsplash)

Health Benefits of Sesame Oil: स्वयंपाकासाठी हेल्दी ऑईल निवडायचं असेल तर तिळाचं तेल उत्तम आहे. इतर कोणत्याही तेलाच्या तुलनेत या तेलात अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदाबरोबरच विज्ञानानेही आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. जाणून घ्या तिळाच्या तेलाचे फायदे

तिळाच्या तेलात असतात हे सर्व गुणधर्म

तिळाला तेलबियांची राणी म्हणतात. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स तसेच पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड म्हणजेच पीयूएफए असते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. इतकंच नाही तर स्वयंपाकाबरोबरच तिळाचं तेल इतरही अनेक प्रकारे वापरले जाते. ज्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.

ट्रेंडिंग न्यूज

तिळाचे तेल कोलेस्ट्रॉल पेशंटसाठी आहे फायदेशीर

तिळाच्या तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी हे तेल खूप फायदेशीर आहे.

हृदयरोगांसाठी चांगले

तिळाच्या तेलात पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते. हे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यापासून प्रतिबंधित करते. ज्यामुळे हृदयाची समस्या कमी निर्माण होते. तिळाचे तेल खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन ई च्या समृद्धीमुळे तीळाचे तेल त्वचेसाठी देखील चांगले मानले जाते. इतकंच नाही तर अभ्यासानुसार, तीळाचं तेल त्वचेच्या जळजळपासून आराम देते. त्वचेवर मसाज केल्याने त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो.

मधुमेहासाठीही तिळाचे तेल आरोग्यदायी

तिळाच्या तेलाचा मधुमेहावर किती परिणाम होतो याबाबत फारसे संशोधन झालेले नाही. परंतु हायपोग्लाइसेमिक गुणधर्मांमुळे ते रक्तातील ग्लुकोजची पातळी व्यवस्थापित करण्यास मदत करते. मात्र मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहारात तिळाचे तेल घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अँटीऑक्सिडेंटने समृद्ध

तिळाचे तेल अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे जे जळजळ कमी करते आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. ज्यामुळे जुनाट आजार, कॅन्सर सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

ओरल हेल्थसाठीही फायदेशीर

आयुर्वेदात ओरल हेल्थसाठी तिळाच्या तेलाचा वापर सांगितला आहे. ऑइल पुलिंगसाठी तिळाचे तेल वापरल्याने तोंड बॅक्टेरियामुक्त राहण्यास मदत होते.

पोटाच्या समस्यांपासून मुक्तता

तिळाचे तेल नैसर्गिक वंगण म्हणून वापरले जाऊ शकते. तीळाचे तेल आहारात खाल्ल्याने बद्धकोष्ठता निर्माण होऊ देत नाही. हे आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढण्यास देखील मदत करते. पोटाच्या समस्यांपासून दूर राहता येते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel