Health Benefits of Drinking Sugarcane Juice: उसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे ते पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण जेव्हाही तुम्ही उसाचा रस पितात तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. उसाच्या रसमध्ये फायबरचे प्रमाण सुमारे १३ ग्रॅम असते. १८३ कॅलरीज आणि ५० ग्रॅम साखर आहे. उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी पेय प्यायचे असेल तर उसाचा रस हा उत्तम पर्याय आहे. त्याचे अनेक गुण हे सर्वोत्तम पेय बनवतात. उसाचा रस पिण्याचे फायदे आणि ते पिण्याची पद्धत जाणून घ्या.
उसाच्या रसामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स पोटॅशियम असतात. त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. उसाचा रस स्पोर्ट्स ड्रिंक म्हणून वापरता येतो. व्यायामानंतर आलेला थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस पिऊ शकतो. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे स्नायूंमध्ये ऊर्जा पुनर्संचयित होते.
उसाचा रस प्रक्रिया केलेला नसतो आणि त्यात फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे हे एक आरोग्यदायी पेय आहे आणि ते प्यायल्याने कर्करोगापासूनही बचाव होतो.
उसाच्या रसामध्ये पोटॅशियम असते आणि ते शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स राखते. जे यकृताला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. कावीळ झाल्यास अनेकदा उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
उसाच्या रसामध्ये थोड्या प्रमाणात फायबर असते. तसेच शरीराला हायड्रेट ठेवते. त्यामुळे शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता नसते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
उसाच्या रसामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियम अजिबात नसते. त्यामुळे ते किडनीसाठीही आरोग्यदायी आहे. हे प्यायल्याने किडनी मजबूत होते. हे यूरिन पास करण्यासाठी मदत करते.
- उसाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
- उसाचा रस वजन कमी करण्यासाठी देखील उत्तम पेय आहे.
- चयापचय वाढवण्याव्यतिरिक्त ते आतड्यांसंबंधी आरोग्य देखील सुधारते.
उसाचा रस पिणे मधुमेही रुग्णांसाठी चांगले नाही. त्यात असलेल्या साखरेचे प्रमाण अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. म्हणून ते पिणे टाळणे चांगले आहे.
- सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवाकर सांगतात की उसाचा रस पिण्याची योग्य वेळ म्हणजे दुपार आहे. दुपारी ते पिणे चांगले.
- उसाचा रस फ्रेश तयार केलेला प्यावा.
- उसाचा रस आणि नारळाच्या पाण्यात थोडासा आल्याचा रस मिसळून प्यायल्याने ते डिटॉक्स ड्रिंकचे काम करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)