Burning Feet: तळव्यांमध्ये जळजळ होते का? या समस्येसाठी कारणीभूत असू शकतात ही कारणं
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Burning Feet: तळव्यांमध्ये जळजळ होते का? या समस्येसाठी कारणीभूत असू शकतात ही कारणं

Burning Feet: तळव्यांमध्ये जळजळ होते का? या समस्येसाठी कारणीभूत असू शकतात ही कारणं

Published Jun 19, 2024 08:10 PM IST

Feet Care Tips: अनेकांना पायाच्या तळव्यात जळजळ होण्याची तक्रार असते. ज्यासाठी अनेक कारणे कारणीभूत असू शकतात. जाणून घ्या कोणती कारणे आहेत ज्यामुळे तळपायात जळजळ होते.

पायांच्या तळव्यामध्ये जळजळ होण्याची कारणं
पायांच्या तळव्यामध्ये जळजळ होण्याची कारणं (unsplash)

Causes and Symptoms of Feet Burning: पायात जळजळ होणे कधी कधी त्रासदायक असते. पायाच्या तळव्यात गरम, सुन्नपणा, मुंग्या येणे जाणवते. विशेषत: रात्रीच्या वेळी ही समस्या वाढते. अशावेळी तळपायात होणाऱ्या या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आधी कारण जाणून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून तळपायातील जळजळवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल.

तळव्यांमध्ये जळजळ होण्याची कारणं

डायबेटिक न्यूरोपैथी

रक्तातील साखर बराच काळ नियंत्रणात नसेल तर ते रक्तवाहिन्यांचे नुकसान करते. ज्यामुळे त्याला सिग्नल मिळणे बंद होते आणि मुंग्या येणे जाणवते.

व्हिटॅमिन बीची कमतरता

पायात जळजळ होण्यासाठी पोषक तत्वांची कमतरता देखील कारण असते. आजकाल बहुतेक लोक व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन बी ९ म्हणजेच फोलेटच्या कमतरतेशी झगडत आहेत. या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे तळपायात जळजळ होते. ज्यामुळे पाय आणि स्नायू यांच्यात समन्वयाचा अभाव निर्माण होतो.

अॅनिमिया

शरीरात लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे अॅनिमिया निर्माण होतो, जो व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होतो. दुसरीकडे अशक्तपणा, सुस्ती आणि श्वास घेण्यास त्रास किंवा दम लागत असेल तर ते व्हिटॅमिन बीच्या कमतरतेचे लक्षण आहे.

हायपोथायरॉइड

अंडरअॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथीमुळे थायरॉईड हार्मोन्स शरीरात असंतुलित होतात. ज्यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होते. २०१६ च्या एका अभ्यासानुसार थायरॉईड ग्रंथी सक्रिय नसल्यामुळे पायात जळजळ होण्याची समस्या उद्भवते.

किडनी डिसीज

जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करणे थांबवते तेव्हा रक्तात विषारी पदार्थ तयार होऊ लागतात. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी, ज्यामध्ये पायात जळजळ होण्याची समस्या उद्भवते. मूत्रपिंडाचा आजार असलेल्या दहा टक्क्यांहून अधिक लोकांच्या पायाच्या खालच्या भागात सूज आणि जळजळ असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner