मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pumpkin Seeds Benefits: केवळ भोपळाच नाही तर त्याच्या बिया देखील आहेत फायदेशीर, पाहा हे कसे खावे

Pumpkin Seeds Benefits: केवळ भोपळाच नाही तर त्याच्या बिया देखील आहेत फायदेशीर, पाहा हे कसे खावे

Jun 24, 2024 01:08 PM IST

How to Use Pumpkin Seeds: अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स आणि मिनरल्सने समृद्ध भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आपल्या आहाराचा त्याचा समावेश कसा करावा याबाबत पाककला तज्ज्ञ नीरा कुमार सांगतात

भोपळ्याच्या बियांचे फायदे
भोपळ्याच्या बियांचे फायदे (unsplash)

Benefits of Pumpkin Seeds: भोपळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भोपळ्याची भाजी, हलवा, मालपुआ, रायता वगैरे पदार्थ येतात. परंतु, त्यातील छोट्या बियाण्यांचा उल्लेखही आपण कधी करत नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणूनच त्यांना सुपर फूडच्या श्रेणीत ठेवले जाते. ते आकाराने अंडाकृती असतात आणि बाहेरचे पांढरे आवरण काढून टाकल्यास हलक्या हिरव्या बिया मिळतात. या बिया तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. जसे पेस्ट भाजून, पावडर बनवून आणि कच्या बिया भिजवून त्याची बेस्ट बनवून. भोपळ्याच्या बिया अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स आणि मिनरल्सने समृद्ध असतात. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेल्या भोपळ्याच्या बिया आहारात कशा प्रकारे घेता येतात ते जाणून घ्या.

आरोग्याला मिळतात अनेक फायदे

- भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास देखील मदत होते. ते टाइप २ डायबिटिज मध्ये देखील चांगले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

- भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते, त्यामुळे त्याच्या सेवनाने बदलत्या ऋतूत होणारे आजार टाळता येतात. या सीड्सचे सेवन केल्याने नैराश्यापासूनही बचाव होतो.

- भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने चांगली झोप येते. यासाठी या बियांची पावडर बनवून रात्री दूधात टाकून प्या किंवा तसेच खा.

- भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने तुमचे हृदय निरोगी राहते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो.

- यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यात सुद्धा हे महत्त्वाची भूमिका बजावते. याचे सेवन केल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.

भोपळ्यांच्या बियांचा आहारात असा करा वापर

- सलाद आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. सलाद बनवल्यानंतर भाजलेल्या भोपळ्याच्या बियांनी ते सजवा. यामुळे सलाद आणखी पौष्टिक होते.

- कुठल्याही प्रकारचे सूप बनवताना त्यात या सीड्सची थोडीशी पेस्ट घालू शकता. यामुळे सूपमध्ये एक वेगळीच चव येते. कधी कधी टोमॅटो सूपच्या वर थोडे भाजलेले सीड्स चिरून काळी मिरी स्प्रिंकल करा.

- पपई रायता असो वा अननसचा रायता, त्यात थोडे भाजलेले सीड्स टाकल्याने चव चांगली लागते आणि ती आकर्षकही दिसते.

- संध्याकाळच्या चहाबरोबर भाजलेल्या बियांमध्ये फ्लेक्स सीड्स, भाजलेले खरबूज बिया, चाट मसाला आणि मीठ वगैरे मिसळून सर्व्ह करा. तुम्ही यात भाजलेले काजू किंवा भाजलेले शेंगदाणे देखील मिसळू शकता.

- या बिया मोड आणून देखील खाल्ल्या जाऊ शकतात किंवा मीठ आणि मिरपूड शिंपडून भाजून खाता येतात.

- ग्रॅनोला बार किंवा शुगर फ्री लाडू इत्यादींमध्ये सुद्धा त्यांचा वापर करता येतो. याशिवाय स्मूदी, ब्रेकफास्ट सीरियल आणि ड्रेसिंग म्हणून पास्ता इत्यादींमध्ये त्यांचा वापर करावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel