Nutmeg Benefits: रात्री झोप न येण्याची समस्या आहे? या साध्या घरगुती उपायाने दूर करा तक्रार
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Nutmeg Benefits: रात्री झोप न येण्याची समस्या आहे? या साध्या घरगुती उपायाने दूर करा तक्रार

Nutmeg Benefits: रात्री झोप न येण्याची समस्या आहे? या साध्या घरगुती उपायाने दूर करा तक्रार

Apr 06, 2024 09:15 PM IST

Sleep Problem: अनेक लोकांना रात्री नीट झोप येत नाही. शांत झोप येण्यासाठी तुम्ही जायफळचे दूध घेऊ शकता. जाणून घ्या झोपेसाठी आणि आरोग्यासाठी जायफळचे फायदे.

Nutmeg Benefits: रात्री झोप न येण्याची समस्या आहे? या साध्या घरगुती उपायाने दूर करा तक्रार
Nutmeg Benefits: रात्री झोप न येण्याची समस्या आहे? या साध्या घरगुती उपायाने दूर करा तक्रार (unsplash)

Nutmeg Milk Benefits: अनेकांना रात्रीची झोप न येण्याची तक्रार असते. प्रयत्न करूनही झोप लागत नाही. त्यासाठी बरेच लोक झोपेच्या गोळ्या घेताना दिसतात. या गोळ्यांचे अनेकदा दुष्परिणाम देखील होतात. अशावेळी कोणत्याही गोळ्या न घेता एका घरगुती साध्या पण तितक्याच परिणामकारक उपायाने रात्री झोप न येण्याची तक्रार दूर करू शकता. रात्री जायफळ पूड घालून एक ग्लास दूध प्यायल्याने झोप न येण्याची तक्रार दूर करण्यास मदत होईल.

रात्री झोपताना ग्लासभर दुधात चिमूटभर जायफळ पूड घालून हे दूध प्यायल्याने शांत झोप लागण्यास मदत होते. त्याशिवाय अपचनाची समस्याही दूर होण्यास मदत होते. चिंता कमी होण, झोपेची गुणवत्ता वाढण्यासही मदत होते. रात्री झोपायच्या आधी जायफळ घातलेले दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. जायफळमध्ये असणारे औषधी गुणधर्म झोपेसह इतर समस्याही दूर ठेवण्यास मदत करते. जायफळमध्ये कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी ६ यासारखी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. झोप येण्यासाठी आवश्यक असलेले अनेक बायोएक्टिव घटक जायफळमध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे नैसर्गिक घटक असलेले जायफळ कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शांत झोप लागण्यास मदत करते.

अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, जायफळ झोपेची गुणवत्ता वाढवण्याच काम करते. झोपण्याआधी जायफळच दूध प्यायल्याने मेंदूमध्ये गाबा पातळी वाढते. त्यामुळे अधिक आरामदायी आणि चिंता कमी होण्यासही मदत होते. निद्रानाश कमी होण्यासह जायफळ अनेक बाबतीत उपयुक्त ठरते. झोपण्याच्या जवळपास दीड तास आधी जायफळ घातलेल दूध पिणे फायदेशीर ठरेल.

जायफळचे इतर फायदे

- तणाव दूर करण्यासाठी जायफळ फायदेशीर आहे.

- चिंता कमी होण्यास मदत होते

- वेदना कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे

- सांधेदुखीची समस्या दूर होते

- मुबलक प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

- सर्दी- खोकल्यापासून आराम मिळतो.

- यात कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner