Benefits of Drinking Cardamom Water: जेवणाची चव वाढवण्यासाठी मसाला म्हणून वापर असो वा मुखवास म्हणून वेलचीचा विविध प्रकारे वापर केला जातो. वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असते. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वेलचीचे पाणी रोज प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. जेव्हा तुम्ही हे पाणी पिता तेव्हा ते क्रेविंग कमी करते. अशा वेळी हे वजन कमी करण्यासही मदत करते. जाणून घ्या वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे आणि ते कसे बनवावे.
सकाळी रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी प्यायल्याने पाचक रसांना चालना मिळते. जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता, सूज, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवून देते.
वेलचीचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. वेलचीचे मूत्रवर्धक गुण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करू शकतो.
जर तुम्ही तुमचा चयापचय वाढवण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर सकाळी वेलचीचे पाणी प्या. हे ड्रिंक तुमच्या शरीरातील चयापचय गती वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे शरीराला अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. अशा स्थितीत वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते.
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर सकाळच्या आहारात हे ड्रिंक समाविष्ट करायला विसरू नका. अहवालांनुसार वेलची रक्तदाब पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वोत्तम परिणाम देऊ शकते.
वेलचीचे पाणी बनवण्यासाठी ५ ते ६ वेलची सोलून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गरम करा. नंतर हे पाणी थोड्या थोड्या वेळाने एक दोन घोट प्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या