मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Argan Oil: चेहऱ्याच्या 'या' समस्यांसाठी प्रभावी आहे आर्गन ऑइल, जाणून घ्या फायदे

Argan Oil: चेहऱ्याच्या 'या' समस्यांसाठी प्रभावी आहे आर्गन ऑइल, जाणून घ्या फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 03, 2024 12:02 PM IST

Skin Care with Argan Oil:त्वचेसाठी फायदेशीर असलेल्या महागड्या तेलांपैकी एक म्हणजे आर्गन ऑइल आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे प्रभावीपणे काम करते.

त्वचेसाठी आर्गन ऑइलचे फायदे
त्वचेसाठी आर्गन ऑइलचे फायदे (unsplash)

Benefits of Argan Oil for Skin: त्वचा फ्लॉलेस आणि ग्लोइंग असावे असे प्रत्येकाला वाटत असते. मुले असो वा मुली त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी विविध उपाय करत असतात. एक तेल आहे जे या समस्या त्यांच्या मुळापासून दूर करू शकतात. आर्गन ऑइल हे एक अतिशय प्रसिद्ध तेल आहे, जे आयुर्वेदात देखील फायदेशीर मानले जाते. मोरोक्कोमध्ये विशेष प्रकारचे नट्स आहेत. त्यांच्यापासून काढलेले तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल रोज लावल्याने त्वचेच्या या ६ समस्यांपासून आराम मिळतो. जाणून घ्या

लटकलेली त्वचा दूर करते

आर्गन ऑइलचा वापर अँटी एजिंग ट्रीटमेंटसाठी केला जातो. हे रोज चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची लवचिकता वाढते. ज्यामुळे त्वचा लटकली असेल तर त्यापासून आराम मिळतो.

ऑइली स्किनसाठी फायदेशीर

तेलकट त्वचेचा त्रास असलेल्या लोकांसाठी चेहऱ्यावर आर्गन ऑइलचा वापर करणे फायदेशीर ठरतो. हे तेल लावल्याने त्वचेमध्ये जास्त प्रमाणात सीबम निर्मिती थांबण्यास मदत होते. रोज आर्गन ऑइलचे काही थेंब लावल्याने तेलकटपणा दूर होतो.

स्ट्रेच मार्क्स कमी करते

आर्गन ऑइल त्वचेचा सैलपणा दूर करते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स वर लावल्यास स्ट्रेच मार्क्स तर कमी होतातच शिवाय मार्क्स हलके होण्यासही मदत होते.

एक्ने ट्रीटमेंटमध्ये मदत

हार्मोनल असंतुलनामुळे अनेकदा चेहऱ्यावर एक्ने, मुरुमे दिसतात. आर्गन ऑइलमध्ये अँटी-सेबम प्रभाव असतो. हे त्वचेवरील एक्नेवर उपचार करण्यास मदत करते.

त्वचेला मॉइश्चराइझ करते

आर्गन ऑइल त्वचेला लवकर मॉइश्चराइझ करण्यास मदत करते. म्हणूनच क्रीम आणि मॉइश्चरायझर्समध्ये याचा वापर केला जातो. यामुळे त्वचेतील पाण्याचे प्रमाण कायम राहते. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चमकते.

 

सन प्रोटेक्शन

आर्गन ऑइल त्वचेला सूर्याच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करते. आर्गन ऑइल सनबर्न आणि हायपरपिग्मेंटेशनपासून संरक्षण करते. रोज आर्गन ऑइलचे काही थेंब लावल्याने त्वचेला चमक येते आणि हायपरपिग्मेंटेशनची समस्याही दूर होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग