Habits That Trigger Constipation in Winter: खराब बाउल मुव्हमेंट आणि पचन कमी झाल्यामुळे बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. विशेषतः हिवाळ्यात हा त्रास वाढतो. यामुळे ब्लॉटिंग आणि गॅससोबत अपचन सारख्या समस्या वाढू लागतात. जर हिवाळ्यात बद्धकोष्ठतेची समस्या वाढू लागली तर ही ५ कारणे कारणीभूत ठरू शकतात. हे टाळून बद्धकोष्ठतेचा सामना करता येतो. या कोणत्या सवयी आहेत ते जाणून घ्या.
थंडीत तहान कमी लागते. त्यामुळे बहुतेक लोक पाणी पिण्याचे प्रमाण कमी करतात. अनेक वेळा आपण तासन्तास पाणी पिणे विसरतो. पाण्याअभावी मल जड होतो. आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागते.
थंडी टाळण्यासाठी लोक अधिक चहा आणि कॉफी पिण्यास सुरवात करतात. त्यात असलेले कॅफिन डिहायड्रेशनसाठी जबाबदार असते आणि नंतर आतड्याच्या हालचालीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते.
हिवाळ्यात लोक त्यांच्या खाण्याच्या सवयींबाबत खूप साहसी होतात. गोड, फॅटी फूड्स खाण्यास सुरुवात करतात. ज्यामुळे त्यांचे संपूर्ण पचन बिघडते. साखर आणि फॅट व्यतिरिक्त लोक त्यांच्या आहारात फळे आणि भाज्या कमी खातात. ज्यामुळे कमी फायबर मिळतं आणि फायबरची समस्या सर्वप्रथम बद्धकोष्ठता वाढवते.
जर तुम्हाला व्यायामाची सवय नसेल तर थंडीमुळे हे आणखी वाढते. थंडीमुळे फार कमी लोक घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत शारीरिक हालचाली मोठ्या प्रमाणात कमी होतात. ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. सतत बसण्याच्या सवयीमुळे बद्धकोष्ठतेचा आजार वाढतो.
लोक हिवाळ्यात बऱ्याचदा आजारी पडतात. त्यामुळे सर्दी, खोकला, दुखणे यासाठी औषधे घेतली जातात. ज्याचा पचनक्रियेवरही दुष्परिणाम होतो. बरीच औषधे तुमच्या पचनसंस्थेसाठी चांगली नसतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)