Vitamin B12 च्या कमतरतेमुळे होऊ शकते चिडचिड, जाणून घ्या लक्षणे-know symptoms and vegetarian sources of vitamin b12 ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Vitamin B12 च्या कमतरतेमुळे होऊ शकते चिडचिड, जाणून घ्या लक्षणे

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे होऊ शकते चिडचिड, जाणून घ्या लक्षणे

Feb 18, 2023 01:26 PM IST

व्हिटॅमिन बी १२ चे महत्त्व लोक सहसा दुर्लक्षित करतात. हे जीवनसत्व शरीर चालवण्यास आणि अनेक रोगांशी लढण्यास मदत करते. एका संशोधनात त्याच्या कमतरतेमुळे होणारे काही नवीन लक्षणे समोर आली आहेत.

व्हिटॅमिन बी १२
व्हिटॅमिन बी १२ (unsplash)

Symptoms ans Vegetarian Sources of Vitamin B12: व्हिटॅमिन बी १२ आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ते डीएनए तयार करते आणि ऊर्जा प्रदान करते. याशिवाय शरीराच्या अनेक आवश्यक कार्यांचे नियमन करते. आपले शरीर हे जीवनसत्व तयार करू शकत नाही. ही गरज आपण खाऊन पिऊनच पूर्ण करतो. शरीरात व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे सहसा माहित नसतात. वाढत्या वयानुसार, हे जीवनसत्व अनेकदा कमी होऊ लागते. म्हणूनच वेळोवेळी त्याची चाचणी आवश्यक आहे. आता एका संशोधनात हे समोर आले आहे की व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे चिडचिड आणि नैराश्य देखील येऊ शकते. त्याच्या लक्षणांबद्दल येथे अधिक जाणून घ्या.

तरुणांमध्ये दिसू शकतात ही लक्षणे

अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल न्यूरोसायन्सेस अँड सायकॉलॉजीच्या टीमने व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेवर संशोधन केले. त्याचे निष्कर्ष क्युरियस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधकांच्या मते, १८ ते २५ वर्षे वयोगटात दिसणारी नैराश्य, चिडचिडेपणा ही लक्षणे व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे देखील असू शकतात. या व्हिटॅमिनचा परिणाम मज्जा संस्थेवर देखील होतो.

जाणून घ्या लक्षणे आणि स्त्रोत

व्हिटॅमिन बी १२ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, जे प्रामुख्याने मीट प्रोडक्टमध्ये आढळते. या कारणामुळे शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये त्याची कमतरता दिसून येते. त्याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, बद्धकोष्ठता आणि संतुलन संबंधीत समस्या, हात-पायांमध्ये मुंग्या येणे, नैराश्य आणि विस्मरण ही लक्षणे दिसतात. जीवनसत्व बी- १२ मासे, मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांसह प्राण्यांच्या उत्पादनांमध्ये नैसर्गिकरित्या असते. व्हिटॅमिन बी १२ चे शाकाहारी स्त्रोत कमी आहेत. हे जीवनसत्व दही, लो फॅट दूध, चीज इत्यादींमध्ये आढळते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग