Vijay Deverakonda Birthday: विजय देवरकोंडाप्रमाणे फिट राहायचं आहे? दररोज करा हे व्यायाम!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Vijay Deverakonda Birthday: विजय देवरकोंडाप्रमाणे फिट राहायचं आहे? दररोज करा हे व्यायाम!

Vijay Deverakonda Birthday: विजय देवरकोंडाप्रमाणे फिट राहायचं आहे? दररोज करा हे व्यायाम!

May 09, 2023 08:43 AM IST

Happy Birthday Vijay Deverakonda: विजयने 'नुव्विला' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. विजयने यानंतर अनेक हिट चित्रपट दिले. अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसचीही नेहमीच चर्चा असते.

Vijay Deverakonda fitness mantra
Vijay Deverakonda fitness mantra (Instagram )

Vijay Deverakonda Fitness: साऊथचा स्टार अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडा. त्याने नुकतंच बॉलिवूडमधेही आपलं नशीब आजमावलं. विजय आज (९ मे) आपला ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ९ मे १९८९ रोजी हैदराबाद येथे झाला. आजघडीला तो एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो, पण अभिनयासोबत त्याचा फिटनेसही नेहमीच चर्चेत असतो. सुपरस्टार विजय फिल्मी करिअरसोबतच फिटनेसकडेही लक्ष देतो. तंदुरुस्त राहण्यासाठी विजय बालेसन्स आहार घेतो आणि दररोज व्यायाम करतो. अनेकदा तो त्याचे वर्कआउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. यावरून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. विजयच्या वर्कआउटबद्दल जाणून घेऊया.

क्लोज ग्रिप लॅट पुल डाउन वर्कआउट

विजय जिममध्ये लेट पुल डाउन वर्कआउट क्लोज ग्रिप करतो. हा व्यायाम केल्याने पाठ आणि हातामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तसेच हात मजबूत होतो. यामुळे पॉशर पण ठीक होते.

केटलबेल वर्कआउट

अलीकडेच, विजयच्या जिम ट्रेनरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विजय केटलबेल वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात. जिम प्रशिक्षक स्नायूंना बळकट करण्यासाठी केटलबेल वर्कआउटची शिफारस करतात.

लेग एक्सटेंशन वर्कआउट

विजय जिममध्ये लेग एक्स्टेंशन वर्कआउट करतानाही दिसतो. त्याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो लेग एक्स्टेंशन वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्यायाम केल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात.

(Disclaimer: लेखातील टिप्स केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. हे कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार घेऊ नका. योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Whats_app_banner