मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Clove Side Effects: या लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे जास्त सेवन, हे होतात दुष्परिणाम

Clove Side Effects: या लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे जास्त सेवन, हे होतात दुष्परिणाम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 31, 2024 12:50 PM IST

Summer Health Care Tips: आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही काही लोकांनी उन्हाळ्यात लवंगाचे जास्त सेवन करू नये. त्याच्या अतिसेवनामुळे त्यांच्या आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचू शकते.

उन्हाळ्यात लवंगचे अतिसेवन केल्याने होणारे दुष्परिणाम
उन्हाळ्यात लवंगचे अतिसेवन केल्याने होणारे दुष्परिणाम (unsplash)

Side Effects of Eating Too Much Cloves: भारतीय स्वयंपाकघरात लवंगाचा वापर जेवणात सुगंध आणि चव आणण्यासाठी केला जातो. लवंगामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मँगनीज यांसारखे पोषक घटक केवळ व्यक्तीचे ओरल हेल्थ चांगले ठेवण्यास मदत करत नाहीत तर पचनक्रिया निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही काही लोकांनी उन्हाळ्यात लवंगाचे जास्त सेवन करू नये. याच्या अतिसेवनामुळे त्यांच्या आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. कसे ते जाणून घ्या.

लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने होणारे नुकसान

लो ब्लड शुगर

लवंगाच्या अतिसेवनाने रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि आधीच साखर नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असाल तर लवंग खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

शरीरातील उष्णता वाढवू शकते

लवंगाचा प्रभाव उष्ण असतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. त्याच्या अतिसेवनाने शरीराचे तापमान वाढू शकते. लवंगाचे जास्त सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या, अपचन, अतिसार किंवा जळजळ आणि हार्टबर्न होऊ शकते.

लिव्हर आणि किडनीची समस्या

लवंगाचे जास्त सेवन केल्याने किडनी आणि लिव्हरलाही नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला यकृत किंवा किडनीच्या आजाराने आधीच त्रास होत असेल तर लवंग जास्त प्रमाणात खाणे टाळा. लवंगाच्या गरम प्रभावामुळे यकृत, मूत्रपिंड आणि पोटाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

ब्लड थिनिंगची समस्या

लवंगाचे जास्त सेवन केल्याने रक्त पातळ होते आणि व्यक्तीला ब्लड थिनिंगची समस्या होऊ शकते. वास्तविक लवंग नैसर्गिक रक्त पातळ करण्याचे काम करते. परंतु जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर दुखापत झाल्यास तुमचा रक्तस्त्राव लवकर थांबणार नाही. इतकंच नाही तर रक्त खूप पातळ होऊ लागलं की इतरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

गरोदरपणात होणारे नुकसान

गरोदरपणात लवंगाचे जास्त सेवन केल्याने सुरुवातीच्या दिवसात ब्लीडिंग होऊ शकतो. तसेच ज्या माता आपल्या मुलांना स्तनपान देतात त्यांच्या दुधाद्वारे त्याचा प्रभाव मुलापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे बाळाला एलर्जी आणि इतर अनेक समस्यांचा धोका असतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel